Strange Trees : हिरव्या झाडीत आढळतात ‘या’ विचित्र वनस्पती; पाहताच उडेल थरकाप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Strange Trees) निसर्ग ही अत्यंत सुंदर अशी दैवी देणगी आहे. ज्यामध्ये हवा, पाणी, झाडे, पशु, पक्षी आणि माणसांचा समावेश आहे. निसर्गाचा मानवी जीवनाशी विशिष्ट संबंध आहे. त्यामुळे निसर्गातील बऱ्याच गोष्टी आपल्याला कायम आकर्षून घेताना दिसतात. निसर्ग जितका सौम्य आणि सुंदर तितका नेत्रदीपक वाटतो. पण अशा या निसर्गात काही गोष्टी रहस्यमय आणि पाहताच थरकाप उडवणाऱ्यादेखील आहेत.

जगभरात ठिकठिकाणी विविध प्रकारची झाडे, झुडुपे आणि वनस्पती आढळतात. ज्यांची वाढ हि तिथल्या विशिष्ट हवामानावर अवलंबून असते. यातील काही वनस्पती औषधी तर काही विषारी असू शकतात. आज आपण हिरव्या गर्द झाडीत आपले वेगळेपण जपणाऱ्या काही वनस्पतींविषयी जाणून घेणार आहोत. (Strange Trees) ज्यांचे स्वरूप गुढमय आणि लक्षवेधी असून मनात भीती निर्माण करणारे आहे. माणसाला वरदान म्हणून प्राप्त झालेल्या निसर्गातील या अजबगजब वनस्पतींना निसर्गचक्रात महत्वाचे स्थान आहे. मात्र तरीही या झाडांबाबत अनेक लोकांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊयात या विचित्र वनस्पतींविषयी.

१) ड्रॅगन ब्लड (Strange Trees)

ड्रॅगन ब्लड या झाडाचे नाव ऐकायला आणि वाचायला जितके विचित्र आहे तितकेच याचे रूप विलोभनीय आहे. या झाडाचे नाव त्याच्या फांद्यांमध्ये आढळणाऱ्या लाल रसापासून ठेवण्यात आले आहे. हे झाड अत्यंत उंच छत्रीच्या आकाराचे असून कधीकधी याचे विचित्र रूप दिसून येते. या झाडावर लाल बेरीचे फळ तयार होते. ज्याचा रंग या झाडातील लाल द्रव्यासारखा असतो.

२) डेविल्स टूथ

या छोट्याशा मशरूमसारख्या दिसणाऱ्या झाडाचे नाव ‘डेविल्स टूथ’ असे आहे. दिसायला हे झाड मशरुमसारखे असले तरी ते खाल्ले जात नाही. या झाडाच्या वरील बाजूस लाल रंगाचे डाग दिसतात. (Strange Trees) जे माणसाच्या रक्तासारखे आहेत. या झाडाकडे नीट पाहिले तर एखाद्या जखमेतून रक्त निघत असल्याचा भास होतो.

३) ऑक्टोपस स्किंकहॉर्न

‘ऑक्टोपस स्किंकहॉर्न’ नावाने ओळखले जाणारी हि छोटीशी वनस्पती खरोखरच ऑक्टोपससारखी दिसते. या झाडाचा रंग लाल असून याचा आकार आठ पायांच्या ऑक्टोपससारखा आहे. (Strange Trees) या झाडाला काही भागात ‘डेव्हील फिंगर्स’ या नावाने देखील ओळखले जाते. या झाडातून असह्य करणारी दुर्गंधी येते आणि यामुळे हे झाड किडे- कीटक आपल्याकडे आकर्षित करतं.

४) ब्लॅक बॅट

या झाडाचे नाव ‘ब्लॅक बॅट’ असे असून याचा आकार पंख पसरवलेल्या एखाद्या वटवाघुळासारखा आहे. हे झाड अधिकतम थायलंडपासून दक्षिण चीनपर्यंत आणि मलेशियामध्ये आढळते. आग्नेय आशियातील पर्जन्य वनांमध्ये खोलवर कुठेतरी हि वनस्पती वाढते. कमी प्रकाशात वाढणाऱ्या या झाडाची फुलं वटवाघळांच्या आकारासारखी दिसतात. (Strange Trees) रात्रीच्या वेळी या झाडाकडे पाहिल्यास एक भव्य वटवाघूळ पाहत असल्याचा भास होतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी हे झाड सकाळपेक्षा जास्त भयावह वाटतं.

५) एंजेल ओक

दक्षिण कॅरोलिनामध्ये आढळून येणाऱ्या या भव्य झाडाची ओळख ‘एंजेल ओक’ अशी आहे. हे झाड दिसायला अत्यंत भव्य असून या झाडाची मुळे दूरवर पसरलेली असतात. काळोखात या झाडाची भव्यता मनात भीती निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे. (Strange Trees)

६) बुद्धाज हँड

‘बुद्धाज हँड’ नावाचं हे अजब गजब छोटं झाड किंवा झुडूप लिबूवर्गीय प्रजातीची वनस्पती आहे. याच्या फांद्या लांब आणि काटेरी असून या झाडावर येणारे फळ नीट पाहिले तर यातून माणसासारखी बोटं बाहेर आली आहेत असा भास होतो. या झाडाचा गंध सुवासिक असून अनेक भागात याचा वापर ‘रूम फ्रेशनर’ म्हणून केला जातो. (Strange Trees)