Streetlights On Moon : चंद्रावर उभारण्यात येणार स्ट्रीटलाइट्स; 100 मीटर पेक्षाही उंच असणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Streetlights On Moon आपल्याला सुरुवातीपासूनच चंद्राचे आकर्षण राहिले आहे. निल आर्मस्ट्रॉंगने सर्वात आधीच चंद्रावर पहिले पॉल टाकलं. त्यानंतर अनेक उपग्रह चंद्रावर पाठवण्यात आली. चंद्रावर वातावरण कस आहे? पाण्याचा साठा आहे का? खनिजे आहेत का? याचा शोध शास्त्रज्ञ घेत असतात. भारताने सुद्धा २०४० पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याची योजना आखली आहे. आता तर शास्त्रज्ञ चंद्रावर उजेड पडण्यासाठी स्ट्रीटलाइट्स बसवण्यात येणार आहेत. या स्ट्रीट लाईट्स उंची कुतुबमिनार पेक्षाही जास्त असेल.

100 मीटर पेक्षाही उंच -Streetlights On Moon

शास्त्रज्ञांना चंद्रावर मानवी वसाहती, रेल्वे यंत्रणा, अणुभट्ट्या इत्यादी उभारायच्या आहेत. परंतु या सर्व गोष्टी करण्यासाठी महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे प्रकाश… कारण प्रकाशच नसेल तर कोणतीच कामे करणं शक्य होणार नाही. आपल्या पृथ्वीसारखे चंद्रासारखं १२ तास दिवस आणि १२ तास रात्र नसते. चंद्रावरचा एक दिवस पृथ्वीच्या दोन आठवड्यांच्या बरोबरीचा असतो. त्यामुळे माणूस जर चंद्रावर गेला तर त्याठिकाणी त्याला सर्वात जास्त गरज लागेल ती म्हणजे प्रकाशाची… त्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीने उपाय शोधला असून चंद्रावर LunarStreetLamp उभारण्याची कंपनीची योजना आहे. हा लाईटचा खांब सोलर बॅटरी म्हणूनही काम करेल.

LUNARSABER असे या प्रकल्पाचे नाव आहे. अमेरिकन सरकारी एजन्सीकडून या प्रकल्पाला निधी दिला जात आहे. त्याचा प्रमोशनल व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक विष्णू सेंगेपल्ली यांनी म्हंटल, चंद्रावर बसवलेला प्रत्येक स्ट्रीटलाईट दिवा हा पृथ्वीवरील दिव्यांपेक्षा स्वस्त असेल आणि त्याची उंची 100 मीटर असेल. जोपर्यंत चंद्रावर दिवस आहे तोपर्यंत LunarSaber दिवे सूर्यप्रकाश साठवून ठेवेल आणि रात्रीच्या वेळी याच साठवून ठेवलेल्या लाईटचा प्रकाश पाडण्यात येईल . चंद्रावर जास्त खड्डे असल्याने या स्ट्रीटलाईट्सची उंची (Streetlights On Moon)जास्त ठेवण्यात आली आहे. जास्त उंचीचे बल्ब असल्याने जास्तीत जास्त भागांवर त्याचा प्रकाश पडेल.