2 महिने विज बिल थकवल्यास थेट बत्ती होणार गुल; महावितरणाची कठोर कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवसेंदिवस महावितरणावर (Mahavatrana) विज बिल थकबाकीचे ओझे वाढत चालले आहे. याचा आकडा 76 हजार कोटींवर पोहोचला आहे. यात दर महिन्याला 400 ते 500 कोटींची आणखीन भरत आहे. त्यामुळेच विज बिल थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणाने आता कंबर कसली आहे. येथून पुढे आपल्या ग्राहकांसोबत महावितरण कठोरपणे वागणार आहे. या तुम्ही दोन महिन्यांपर्यंत वीज बिल थकवले तर तुमची बत्ती गुल होणार आहे.

महावितरणाकडून सुमारे 13 हजार 433 कोटी रुपयांची थकबाकी मार्चपर्यंत वसूल केले जाणार आहे. यासाठीच दोन महिन्यांचे वीस बिल कोणी थकवले तर त्यांची वीज कापली जाईल असा इशारा देखील महावितरणाने दिला आहे. सध्या कृषिपंपधारक आणि कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या लोकांना वगळून सुमारे 83 लाख घरगुती आणि 13 हजार कोटी वाणिज्यिक ग्राहकांकडे विज बिल थकबाकी आहे. आता या थकबाकीत आणखीन वाढ होऊ नये त्यामुळे महावितरणाने कडक नियम आखले आहेत.

महत्वाचे म्हणजे त्या मार्च महिन्यापर्यंत जास्तीत जास्त थकबाकी वसूल करण्याचे निर्देश महावितरण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, एखाद्या ग्राहकाने दोन महिन्यांपर्यंत विज बिल थकवले तर त्याची वीज खंडित करण्याचे आदेश देखील अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वीज थकबाकीचे सर्वात जास्त प्रमाण आहे. आता या सर्वांकडून ही थकबाकी वसूल करण्यात येणार आहे.