वैद्यकीय विश्वामध्ये खळबळ उडवून टाकणारी घटना कोलकत्ता येथील एका सरकारी रुग्णालयात घडलेली आहे. या रुग्णालयात एका डॉक्टरची बलात्कार करून हत्या झालेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशाला हादरा बसलेला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर नियमित काम करणार नाही. ही माहिती त्यांनी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रेसिडेंट डॉक्टर्स यांनी कळवलेली आहे.
या काळात काम जरी सुरू नसले, तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहे. याबाबतची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. परंतु रुग्णालयातील दैनंदिन कामावर मात्र या गोष्टीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता देखील आहे. यावेळी फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सुद्धा डॉक्टरांना निवडक सेवा बंद करण्याचे आवाहन केलेले आहे.
त्यामुळे आता राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयात देखील काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे काम बंद आंदोलन चालू राहणार आहे. निश्चित काळासाठी हे आंदोलन चालू राहण्याची देखील त्यांनी सांगितलेले आहे. या वैद्यकीय क्षेत्रात कोलकत्ता येथील घटनेचा तीव्र शब्दात त्यांनी निश्चित देखील व्यक्त केलेला आहे.
शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर असणे, हे खूप गरजेचे आहे. तो डॉक्टर आरोग्य व्यवस्थेचा कणा मानला जातो. त्यांच्या शिवाय कोणत्याही रुग्णालयाचे काम सुरळीतपणे चालू शकत नाही. त्यामुळे आता प्रशासनाला व्यवस्थित चालण्यासाठी अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन करावे लागत आहे. परंतु या ठिकाणचे काम बंद असल्याने रुग्णांना याचा फटका बसू शकतो.कारण मुंबई महानगरपालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात.
याबाबतची माहिती देताना वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलेले आहे की, या निवासी डॉक्टरांचे काम बंद असलेले आंदोलनामुळे अनेक शस्त्रक्रिया देखील रद्द करावे लागणार आहेत. तसेच शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची रुग्णांना देखील दाखल करून घेतले जाणार नाही. तसेच तातडीच्या वैद्यकीय सेवेची आवश्यकता नसेल, तर त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. या रुग्णालयामध्ये आता रुग्णांना उपचार घेण्यासाठी काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
या रुग्णालयांना बसणार फटका
- जे. जे. समूह रुग्णालये (जी टी, कामा आणि सेंट जॉर्जेस)
- केइएम रुग्णालय
- सायन रुग्णालय
- नायर रुग्णालय
- कूपर रुग्णालय
काय आहेत मागण्या?
सरकारी निवासी डॉक्टरांनी हे आंदोलन चालू केलेले आहे. त्या आंदोलनामध्ये कोलकत्ता निवासी डॉक्टरांची जर मृत्यू झाला आहे. त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आहे त्याचप्रमाणे संपकरी निवासी डॉक्टरांचा पोलिसांनी जाच करू नये. तसेच तज्ञांची समिती स्थापन करून केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षित करावी. वस्तीगृहाची व्यवस्था करून डॉक्टरांची चांगल्या खोल खोलीत व्यवस्था करावी. रुग्णालयाचे परिसरात सीसीटीव्ही बसवावेत आणि सुरक्षारक्षकांची देखील नियुक्ती करावी.