नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा राहणार तगडा बंदोबस्त; ‘इतके’ हजार पोलीस सज्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील आगामी हिवाळी अधिवेशनास 19 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या यंदाचे अधिवेशन अनेक मुद्यांनी चांगलेच गाजणार आहे. विरोधकांकडून सरकारला घेरण्यात येणार असल्याने या अधिवेशनावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत.

नागपूर हिवाळी अधिवेशनास 19 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्यासाठी बाहेर जिल्ह्यातून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ताफे नागपुरात दाखल होत आहेत. या ठिकाणी पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून शहरात अधिवेशनासाठी निवासस्थानापासून ते जेवणापर्यंतची तयारी केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बंदोबस्तासाठी राज्यभरातून शहरात आलेल्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली आहे. अधिवेशनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या 7 हजार पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) 7 तुकड्यांचा समावेश आहे. आधुनिक सुविधा असलेली 5 सुसज्ज अशी दक्षता वाहने, 1 हजार होमगार्ड, 12 बॉम्ब शोधक-नाशक पथकांसह विशेष कमांडो सुरक्षेसाठी सज्ज आहेत.