STSS Bacteria : माणसांत वेगाने पसरतोय ‘हा’ जीवघेणा आजार; जखमेतून मांस खाणाऱ्या विषाणूचा जगभरात हाहाकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (STSS Bacteria) पावसाळ्याच्या दिवसात संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात. हवेतील आद्रता आणि त्यात मिसळले जाणारे धुळीचे कण हे घातक विषाणूंच्या वाढीस कारणीभूत असतात. हे विषाणू जसजसे सक्रिय होतात तसतसे विविध संसर्ग पसरू लागतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात बरीच लोक सतत आजारी पडताना दिसतात. कोरोनानंतर नुसतं विषाणूबद्दल बोलायचं झालं तरी कित्येकांच्या अंगावर काटा उभा राहताना दिसतोय. अशातच एका नव्या बॅक्टेरियाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. हा बॅक्टेरिया आपल्या शरीरावरील जखमेतून आतमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे होणाऱ्या आजराचे नाव स्ट्रेप्टो- कॉकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम असे असून हा आजार इतका घातक आहे की, त्याच्या प्रभावामुळे एखादी व्यक्ती दगावू शकते. याविषयी अधिक जाणून घेऊया.

स्ट्रेप्टो-कॉकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (STSS Bacteria)

वृत्तानुसार, कोव्हीडनंतर मानवी जीवावर उठलेल्या या नव्या रोगाचे रुग्ण जपानमध्ये आढळले आहेत. या आजाराचे नाव स्ट्रेप्टो-कॉकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम अर्थात एसटीएसएस असे आहे. हा आजार मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे होतो असे बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात हा जीवाणू शरीरावरील जखमांमध्ये शिरून आपले मांस खात नाही. तर शरीरातील ऊतींचा नाश करतो. जे रुग्णासाठी अतिशय धोकादायक स्थिती निर्माण करते आणि यामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो.

संसर्ग झाल्यास ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू

एसटीएसएसने संक्रमित व्यक्तीचा केवळ ४८ तासांच्या आत मृत्यू होतो, असे जपानमधील प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. वृत्तानुसार, २०२४ या सालात आतापर्यंत जपानमध्ये एकूण १ हजार प्रकरणे समोर आली आहेत. (STSS Bacteria) या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मानवी जीवन संपुष्टात येऊ शकते. दरम्यान, काही तज्ञांनी ही रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. या रोगाचा मृत्यू दर हा ३०% असून रुग्णांची वाढती संख्या मोठे संकट असल्याचे भासत आहे.

STSS चा संसर्ग कसा होतो?

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा जीवघेणा आजार स्ट्रेप्टो- कोकस नामक बॅक्टेरियामुळे होतो. या बॅक्टेरियाचे एकूण २ प्रकार आहेत. यापैकी एक ग्रुप- ए स्ट्रेप्टो-कोकस तर दुसरा ग्रुप- बी स्ट्रेप्टो- कोकस म्हणून ओळखला जातो. यातील ग्रुप- ए स्ट्रेप्टो- कोकस हा अत्यंत गंभीर बॅक्टेरिया समजला जातो. या विषाणूचा संसर्ग झाल्यास उद्भवणाऱ्या लक्षणांना ‘टॉक्सिक शॉक सिंड्रोम’ म्हणतात. (STSS Bacteria) हा एक जीवघेणा आजार असून वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो.

टॉक्सिक शॉक सिंड्रोमची कारणे

स्टॅफिलोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकससारख्या भयंकर बॅक्टेरियाच्या प्रभावामुळे हा आजार होतो. रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तीला हा संसर्ग लगेच होतो. एखाद्या दुखापतीत झालेली जखम उघडी राहिली असेल किंवा एखादी शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा लोकांना हा संसर्ग लगेच होऊ शकतो. (STSS Bacteria) वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

टॉक्सिक शॉक सिंड्रोमची लक्षणे

  • ताप
  • जखम ओली राहणे
  • मुरुम फुटून रक्त वाहणे
  • शस्त्रक्रिया झाली असेल तर खूप वेदना होणे
  • रक्तदाब अचानक कमी होणे
  • चक्कर येणे
  • मळमळ, उलट्या होणे
  • हाता- पायांना सूज येणे

प्रतिबंध आणि उपचार

तसे पाहिले तर, भारतात या सिंड्रोमची प्रकरणे जास्त नाहीत. मात्र, असे असले तरीही आपल्याला आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे सतत हात धूत राहा. (STSS Bacteria) व्हायरल इन्फेक्शन असल्यास मास्कचा वापर करावा. कोणतीही जखम चिघळत असेल, वाढत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.