Satara News : कण्हेर धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू; सुट्टीमुळे 10 मित्र पोहायला गेले अन्…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणात पोहताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्वराज संभाजीराव माने-देशमुख (वय 23, रा. अकलूज (सध्या रा. सातारा येथील मंगळवार पेठे) असे बुडालेल्या युवकाचे नाव असून तो रायगाव (ता. जावली ) येथील छाबडा कॉलेजमधील विद्यार्थी आहे. या घटनेने शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय तृतीया व रमजान ईदनिमित्त सर्व कॉलेज व शाळांना सुट्टी असल्याने छाबडा कॉलेजचे विद्यार्थी कण्हेर धरणात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. यावेळी धरणात पोहत असताना स्वराज संभाजीराव माने-देशमुख याला दम लागला आणि दुर्दैवाने तो पाण्यात बुडला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी मित्रांनी आरडाओरडा केला, परंतु लांब पाण्यामध्ये स्वराज्य बुडाल्याने त्याला वाचवण्यात अपयश आलं.

या घटनेची माहिती मिळताच धरण परिसरातील नागरिकांनी धरणावर गर्दी केली आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनस्थळी हजर झाले. स्वराज माने-देशमुख हा छाबडा कॉलेजमध्ये BHMS च्या दुसऱ्या वर्षांमध्ये शिकत होता. मूळचा अकलूजचा असलेला स्वराज्य शिक्षणासाठी सातारा येथे राहत होता. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ आहे.