अकॅडमीच्या संचालकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे शहरामध्ये (Pune News) दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होत चालली आहे. कारण की, पुन्हा एकदा पुण्यामध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. “मी तुझे करिअर बनवून देईल तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये रहा, मी तुझ्या घरच्यांना सांगेल तू इथे मुलांसोबत असते”असे म्हणत आरोपीने विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार केली आहेत. क्रिएटिव्ह अकॅडमीचे संचालक नौशाद शेख असे या आरोपीचे नाव आहे.

प्रकरण काय आहे?

समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर येथे आरोपी नौशाद अहमद शेख यांची क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमी आहे. या अकॅडमीमध्ये 2021 साली पीडित विद्यार्थिनीने ऍडमिशन घेतले होते. यासाठी तिने 2 लाख 26 हजार रुपये ऍडमिशन फी भरली होती. प्रवेश घेतल्यानंतर मुलगी अकॅडमीमध्येच राहू लागली. याच हॉस्टेलच्या पहिल्या मजल्यावर आरोपी देखील राहत होता. त्याने विद्यार्थिनीवर दबाव आणण्यासाठी “मी तुझे करिअर बनवून देईल तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये रहा” असे तिला सांगितले. परंतु हे सर्व करण्यासाठी मुलगी तयार झाली नाही. यामुळे आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच “तू हे घरी सांगितले तर, तुझ्या घरच्यांना फोन करून सांगेन तू इथे मुलांसोबत संबंध ठेवते” असे विद्यार्थिनीला धमकावले.

इतकेच नव्हे तर, 2022 साली आरोपीने विद्यार्थिनीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतले होते. याठिकाणी देखील त्याने विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी विद्यार्थिनीने प्रतिकार करत आपली तेथून सुटका केली. या सर्व घटने प्रकरणे पोलिसांनी अकॅडमीच्या एका माजी विद्यार्थिनीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी नौशाद शेखला अटक केले आहे. परंतु सध्या या सर्व घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.