सरकारने मोफत कौशल्याधिष्ठीत कोर्स सुरू करावेत – प्रा सुभाष वाघमारे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाचवड | स्थानिक प्रतिनिधी

“संयुक्त राष्ट्र संघाच्या युनेस्को समितीने २०१८ हे वर्ष” साक्षरता आणि कौशल्य विकास” या नावाने साजरे करण्याचे ठरविले असून भारत सरकारने देशातील कौशल्यपूर्ण कामगारांची संख्या वाढविण्यासाठी गरजूंना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे, आणि त्यासाठी गरजे नुसार कोर्स सुरू करावेत असे मत प्राध्यापक सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले, पाचवड येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या महाविद्यालयात,राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख,प्रा.गणेश तारु उपस्थित होते

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन हा ८ सप्टेंबर १९६६ पासून साजरा केला जात असून आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विद्न्यान, आणि सांस्कृतिक विकास, यातून शांतता आणि सुव्यवस्था उत्तेजन देण्यासाठी साक्षरता दिन साजरा केला जात असल्याचे त्यानी सांगितले, केरळ हा शंभर टक्के साक्षर असला तरी आजही तेथे साक्षरता वाढविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, केरळने जगाला शिक्षणाद्वारे मनुष्य बळ पुरविले आहे, बिहार सर्वात मागे आहे, सफल जगणे, गरीबी हटविणे,बाल मृत्यु थांबविणे, लोकसंख्या दर कमी करत जाणे, लिंगभाव समता प्रस्थापित करणे, बेकारी कमी करणे, जातिव्यवस्था नष्ट करून समता प्रस्थापित करणे, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम सर्वत्र प्रसार करणे, विज्ञानाचा प्रसार करणे, धर्मांध विचारसरणीस पायबंद घालणे, देशात वैचारिक जागृती करणे, जगाबरोबर चालण्यासाठी कृति कार्यक्रम सुरू करणे आवश्यक आहे, नुसते खोट्या घोषणा आणि भपकेबाज कार्यक्रम करण्याने वास्तव बदलत नाही, त्यासाठी नैतिकता लागते असेही ते म्हणाले.

मुलींच्यावर होणारे बलात्कार, धर्मांधानी कायदा हातात घेणे हे सगळे लोकांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण आहे, लोकांनी विधायक कामे करून देशाला वाचवावे, केवळ लिहण्या-वाचण्याची साक्षरता अभिप्रेत नाही, तर कौशल्य, तंत्रविद्न्यान आवश्यक आहे, लोकांना हताश वाटता कामा नये, भाषणबाजी पेक्षा कामाची खात्री देणारी यंत्रणा राज्य आणि केंद्र सरकारने उभी करावी, आदिवासी आणि मागास, या लोकांचेसाठी सरकारने अधिक जागृती व प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत असे ते म्हणाले जाहिरात कराच पण कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम मोफत असल्याची करा असेही ते म्हणाले. गरीबी असली तरीही शिकलेल्या लोकांनी समाजात एेक्य निर्माण करण्यासाठी काम करावे असे ते म्हणाले,
अध्यक्षीय भाषणात राजेंद्र देशमुख यांनी भारतात वैचारिक जागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले,.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा दिलीप घोलप यांनी केले, तर प्रा इंद्रजीत एेवळे यांनी सुत्र संचालन केले, या कार्यक्रमास प्रा बी. आर. नदाफ, प्रा,भिसे एम.पी. राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा प्रदीप शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Comment