Subsidy For Digging Of Well | विहीर खोदण्यासाठी सरकारकडून मिळणार 100 % अनुदान, आजच घ्या ‘या’ योजनेचा लाभ

0
1
Subsidy For Digging Of Well
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Subsidy For Digging Of Well | शेतकऱ्यांना शेती करताना शेतीसोबत इतर अनेक गोष्टींची देखील खूप काळजी घ्यावी लागते. आपले पीक चांगले येण्यासाठी शेतीला लागणारे खत, बी-बियाणे त्याचप्रमाणे पाणी या सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात द्याव्या लागतात. तरच शेतीतील पीक चांगले येते आणि शेतकऱ्यांना फायदा होतो. आजकाल शेती करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. शेतीसाठी लागणारे पाणी उपलब्ध करण्यासाठी शेतकरी विविध मार्गांचा अवलंब करतात.

शेतीसाठी शेतकरी विहीर, बोरवेल्स खणतात. त्यामुळे त्यांच्या शेताला पाणी मिळते. परंतु जर एखाद्या दुष्काळी भागात पाणी नसेल, तर त्यांना चांगल्या प्रकारे शेती करता येत नाही. चांगली शेती असून देखील जर पाणी नसेल तर ते पीक चांगले येत नाही.

शेतकऱ्यांच्या याच बाजूचा विचार करून राज्यांमध्ये कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (Subsidy For Digging Of Well) सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता नवीन विहिरी खोदण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये ज्या गावांचा समावेश येतो, त्या गावांमध्ये जे अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना चांगल्या प्रकारे शेती करता यावी आणि पाण्याची सोय निर्माण व्हावी या हेतूने ही योजना काढण्यात आलेली आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक अटी देखील दिलेल्या आहेत. या अटींची जर पूर्तता तुम्ही करू शकले, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेच्या अटी कोणत्या ?

या प्रकल्पांतर्गत जर विहिरीचा भाग घ्यायचा असेल तर शेतकऱ्याकडे असलेल्या एकूण जमिनीचे क्षेत्र हे 0.40 हेक्टरपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून फायदा मिळतो. ज्या शेतकऱ्यांनी अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाही.
ज्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. जे नवीन विहीर घेणार आहे ती विहीर आणि पिण्याच्या पाण्याच्या सार्वत्रिक स्त्रोत यातील अंतर 500 मीटरपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र भूजल अधिनियम 2009 त्यानुसार या योजनेअंतर्गत घेण्यात येणारी प्रास्ताविक विहीर आणि अस्तित्वात असलेल्या इतर विहिरी यांच्यामधील अंतर 150 मीटरपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
नवीन विहीर खोदणे आणि इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी जास्तीत जास्त 1 वर्षाचा कालावधी देण्यात येणार आहे.

विहीर योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार?

सरकारच्या या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या नवीन विहिरीची निर्मिती या घटकाअंतर्गत 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान 2 टप्प्यात शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. यातील पहिला टप्पा म्हणजे विहिरीचे खोदकाम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ते काम झाल्यावर अंदाजपत्रकानुसार एकूण खोदकामावरील खर्च देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्पा हा विहिरीचे खोदकाम आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकात नुसार देण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून 100 टक्के म्हणजे 2.50 लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.

अर्ज कुठे करू शकता ? | Subsidy For Digging Of Well

या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. तसेच सगळ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता देखील करावी लागेल.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.