शेतकऱ्यांना शेती अवजारांच्या खरेदीसाठी मिळणार अनुदान; फक्त या योजनेसाठी करा अर्ज

farmers scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र आणि राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी सतत विविध योजना राबवत असते. आता सरकारकडून शेतकऱ्यांच्या शेती अत्यावश्यक साधनसामग्री खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या उपकर निधीमधून आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. शेती साहित्य योजनेअंतर्गत (Agricultural Material S) जिल्ह्यातील 1,140 शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी तर 80 शेतकऱ्यांना सोयाबीन चाळणीसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या उपकर निधीचा उपयोग हा शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या स्वरूपात केला जातो. कृषी विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षात बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंप व सोयाबीन चाळणी यंत्रासाठी 75% अनुदान देण्याची घोषणा केली होती. यासाठी अर्ज मागवण्यात आले होते आणि पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

त्यानुसार, ही मदत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. मात्र, अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी 10 मार्चपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

अनुदानाचा तपशील

सोयाबीन चाळणी यंत्रासाठी – 9,377
बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी – जीएसटी बिल सादर केल्यानंतर 2,800

तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्या

योजनेंतर्गत विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असला तरी, वाशिम व कारंजा तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळालेला नाही. मंगरूळपीर तालुक्यात सर्वाधिक 32 शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. खरेदी बिल (जीएसटी क्रमांकासह)
  2. बँक खात्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
  3. अनुदान अर्ज व प्रतिज्ञापत्र
  4. कृषी विस्तार अधिकाऱ्यांचा तपासणी अहवाल
  5. साहित्य खरेदीनंतर अधिकाऱ्यांसोबतचा जिओ-टॅग केलेला फोटो

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक साधनांच्या खरेदीस चालना मिळणार आहे. त्यामुळे, अनुदानाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज सादर करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.