आधुनिक पद्धतीने केळीची शेती ‘हा’ शेतकरी कमवतोय लाखो रुपये; विदेशातही होतीये निर्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल अनेक तरुण लोक शेतीमध्ये पदार्पण करत आहेत. आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेत आहेत. आता पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न देखील चांगले मिळते आणि शेतमाल देखील चांगल्या किमतीने विकला जातो. शेतामध्ये जर तुम्ही या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला. आणि चांगले व्यवस्थापन केले तर पिकाचा दर्जा उत्पादनासाठी खूप वाढतो.

आज काल शेतकरी हे आधुनिक पद्धतीने शेती करून केवळ भाजीपालाच नाही, तर फळांची देखील लागवड करत आहेत. एवढेच नाही तर मसाल्यांच्या पिकांचे देखील लागवड होताना दिसत आहेत. त्यामुळे आपला महाराष्ट्रातील शेतकरी चांगलाच आधुनिक पद्धतीने शेती करत आहे हे समोर येते.

तालुक्यातील राजुरी येथे एका शेतकऱ्याने पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती केलेली आहे. त्याने तंत्रज्ञानाचा वापर करून मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करायला सुरुवात केलेली आहे. त्याने तंत्रज्ञानाचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे केळीचे पीक घेतलेले आहे. आता त्याच्या त्याची केळी ही इराक, इराण आणि ओमान यांसारख्या देशामध्ये निर्यात देखील होऊ लागलेली आहे. जुन्नर तालुक्यात त्याच्या केळीला देखील खूप चांगला भाव मिळत आहे.

या शेतकऱ्याने मागील काही वर्षापासून योग्य असे व्यवस्थापन करून चांगल्या केळीचे उत्पादन घेतले. आणि त्याची ही केळी बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जाऊ लागली. सध्या ही केळी इराण इराक ओमान यांसारख्या देशांमध्ये निर्यात केली जात आहे. यामुळे शेतकऱ्याला देखील खूप चांगला आर्थिक नफा झालेला आहे. त्याने जवळपास 250 ते 300 एकर क्षेत्रामध्ये केळीचे पीक घेतलेले आहे. तसेच इंदापूर भागातील ज्या काही एक्सपोर्ट कंपन्या आहेत. त्या देखील केळी बागेची पाहणी करून केळीची खरेदी केली जाते.

या शेतकऱ्याने वेगवेगळ्या जातीच्या केळींची लागवड केलेली आहे. नवती केळ्यांना26 ते 29 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे. तर खोडवा केळीला 23 ते 24 रुपये प्रति किलो एवढा दर मिळत आहे. हा शेतकरी एका एकरमध्ये जवळपास 35 ते 40 त्यांना पर्यंत केळीचे उत्पादन घेत आहे. आणि एका एकरमध्ये त्याला 7 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

या शेतकऱ्याने योग्य प्रकारे व्यवस्थापन केलेले आहे. पिकाला पाणी देण्यासाठी त्यांनी दुहेरी ठिबक सिंचनाचा वापर केलेला आहे. तसेच पाण्यात विद्राव्य म्हणजेच वॉटर सोल्युबल खतांचा गरजेप्रमाणे पुरवठा केलेला आहे. त्यामुळे पिकांना देखील त्याचा फायदा होतो. तसेच वेळोवेळी तो औषध फवारणी करतो. तसेच पोंगे भरणी करतो. तसेच जुलै महिन्यामध्ये केळीचे घड बाहेर यायला लागले तेव्हा बडइंजेक्शन देखील करून घेतलेले आहे.