जिद्दीपुढे झुकलं दारिद्रय : भंगार विक्रेत्याचा मुलगा अक्षय झाला नायब तहसीलदार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरची परिस्थिती बेताची असल्याने उच्च शिक्षण घेण्यास अनेक अडचणी येत होत्या. वडिलांनी भंगार विक्रीचा व्यवसाय करून त्याला वाढवलं. पण त्यानं अशी काढी जिद्द केली केली त्याच्या जिद्दीपुढं दारिद्र्याला झुकावं लागलं. हि यशोगाथा आहे MPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या अमरावतीच्या तिवसा येथील अक्षय बाबाराव गडलिंग या तरुणाची. घरची परिस्थिती बेताची, कुटुंबाचे हातावर पोट असताना जिद्दीच्या जोरावर यश मिळवत नायब तहसीलदारपद मिळवलं आहे. पाहूया त्याचा प्रवास…

झोपडीत केला अभ्यास

अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिलेल्या अक्षयने आपल्या झोपडीत दिवा लावून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून यश मिळवले. मात्र, त्याने आपल्या गरीबीचं कधीही भांडवल केलं नाही. त्याच्या जिद्द आणि चकाटीसमोर आज दारिद्र्यलाही झुकावं लागलं.

Akshay Gadling

वडीलांचा 40 वर्षांपासून भंगार व्यवसाय

अक्षयचे वडील बाबाराव गडलिंग यांचा गेल्या 40 वर्षांपासून भंगार आणि रांगोळी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गरिबीची चणचण अक्षयला भासू नये यासाठी वडिलांनी अक्षयला अभ्यासासाठी कुठलीच कमतरता भासू दिली नाही. ध्येयवेड्या अक्षयने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बळगले आणि त्याने वयाच्या 25 वर्षी सत्यात उतरवले.

Success story of Akshay Gadling

PSI वन विभागाची परीक्षा झाला होता उत्तीर्ण पण…

अक्षयने शालेय जीवनात अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्याने शाळेच्या वाद-विवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आणि इतर स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत त्याने अगोदर PSI वन विभागाची परीक्षादेखील पास केली होती. मात्र, काही कारणास्तव तो जाऊ शकला नाही. तरीही तो खचला नाही. त्याने अभ्यास सतत चालू ठेवला.