नक्षल प्रभावीत भागातील तरुणीचा संघर्षमय प्रवास; नम्रता बनली IAS ऑफिसर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्यामध्ये जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो. हेच नक्षल प्रभावीत भाग म्हणून ओळख असलेल्या छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील एका मुलीने दाखवून दिले आहे. कठोर परिश्रम आणि कष्टाने अभ्यास करत तिने UPSC परीक्षा दिली आणि यशही मिळवले आहे. पाहूया IAS ऑफिसर झालेल्या नम्रता जैन यांचा संघर्षमय प्रवासाची यशोगाथा…

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील आला छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या नम्रता जैन या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. हुशार असल्यामुळे परीक्षेतही चांगले गन मिळत असे. मात्र, नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे या ठिकाणी जिवाचीही तितकीच भीती होती. परंतु अधीकारी होण्याचं स्वप्न पाहिलेल्या नम्रता यांनी MPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आणि सुरु झाला त्यांचा अधिकारी होण्याचा प्रवास.

आयएएस नम्रता जैन या छत्तीसगडच्या दंतेवाडा येथील आहेत. हा नक्षल प्रभावीत भाग असल्याने येथील साक्षरतेचे प्रमाण खूपच कमी आहे. बेरोजगारी आणि घरगुती वादाच्याही घटना येथे सातत्याने घडत असतात. मात्र, या परिस्थितीतही 2 जी इंटरनेट असलेल्या भागात राहणाऱ्या नम्रता जैन यांनी आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास अनेक अडचणींसह पूर्ण केला.

https://www.instagram.com/p/ByMpNjLjbMs/?utm_source=ig_web_copy_link

अडथळे आले तरीही माघार घेतली नाही

लहानपणापासूनच आपण आयएएस अधिकारी व्हायचं असे त्यांनी ठरवले होते. मात्र, सरकारी नोकरीच्या मार्गात त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी कधी माघार घेतली नाही. त्या पुढे जातच राहिल्या.

Namrata Jain

आईमुळे शिक्षणासाठी बाहेर पडू शकल्या नम्रता

आयएएस नम्रता जैन यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण दंतेवाडा येथील कार्ली येथील निर्मल निकेतन शाळेत केले. तर 10 वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्यासाठी काही अडचणी होत्या. कारण त्यांच्या घरच्यांनी त्यांना अभ्यासासाठी दूर कुठेतरी पाठवण्यास नकार दिला होता. मात्र, त्याच्या आईने कुटुंबीयांची समजूत घातल्याने त्याला केपीएस भिलाई शाळेत दाखल करण्यात आले. तेथून बारावीची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी भिलाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले.

Namrata Jain 03

पहिल्या प्रयत्नात अपयश तरीही सुरु ठेवली तयारी

नम्रता जैन यांनी 2015 मध्ये यूपीएससीची पहिली परीक्षा दिली होती. यामध्ये त्या नापास झाल्या होत्या. त्यानंतर 2016 मध्ये त्या 99 वी रँक मिळवून मध्य प्रदेश केडरच्या आयपीएस अधिकारी बनल्या. 2018 मध्ये त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि ऑल इंडिया रँक 12 वा क्रमांक प्राप्त करत त्यांनी IAS सेवेला गवसणी घातली.

Jain

काकांचे स्वप्न केले पुतणीने पूर्ण

यूपीएससी परीक्षेच्या तयारी दरम्यान, नम्रता यांच्या दोन काकांचा 6 महिन्यांच्या फरकाने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यामुळे त्या आतून त्या खूप तुटल्या होत्या. मात्र, नंतर काकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दुप्पट मेहनत करून तयारी करू लागल्या. या काळात त्यांच्या आईने त्याला पूर्ण पाठिंबा दिला.

Jain

अगोदर प्रेम नंतर केले लग्न

यानंतर IAS नम्रता जैन यांनी 16 सप्टेंबर 2020 रोजी छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात तैनात IPS निखिल राखेचा यांच्याशी विवाह केला. या दोघांच्या विवाह सोहळ्यात जिल्ह्यातील अनेक अधिकारी सहभागी झाले होते. 2019 मध्ये ट्रेनिंग दरम्यान या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली होती.