हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा तेजीने विकास होत असल्यामुळे तरुण वर्ग नोकरीसाठी देखील याचं क्षेत्रात जास्त कल घेताना दिसत आहे. मात्र असे असताना देखील लखनौ येथील अनुष्का जयस्वाल (Anushka Jaiswal) हिने व्यावसायिक क्षेत्रात काम करण्याऐवजी शेतीचा मार्ग निवडला आहे. दिले विद्यापीठातून उत्तीर्ण झालेली अनुष्का आज शेती व्यवसायातून दरमहा 2 लाख रुपये कमवत आहे. या कारणामुळेच तिचे राज्यात भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
सुरुवातीला 1 एकर जमिनीत शेती केली….
27 वर्षीय अनुष्काने ती 23 वर्षांची असताना शेती करायला सुरूवात केली होती. आज तीने या शेती व्यवसायातून 20 हून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. तसेच ते दरमहा 2 लाखांपेक्षा देखील अधिक उत्पन्न मिळवत आहे. याबाबतची माहिती देताना सांगितले आहे की, तिने 2021 साली शिक्षण संपल्यानंतर वेगळे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे तिने लखनौच्या सिसेंडी गावात एक एकर जमीन खरेदी केली. सरकारची मदत घेऊन तिने या जमिनीत पॉलिहाऊस उभारले. या पॉलिहाऊस मध्ये वेगवेगळ्या भाजा तिने लावल्या. यातूनच तिला चांगला नफा मिळू लागला.
सध्याच्या घडीला अनुष्का सहा एकर शेती करत आहे. तिने या शेतामध्ये सिमला, मिरची, कोबी, फ्लॉवर आणि इतर भाज्या लावल्या आहेत. यातूनच तिला चांगले उत्पन्न मिळत आहे. तुझ्या शेतात पिकवलेल्या सर्व भाज्या फळे शॉपिंग मॉलमध्ये विकल्या जातात. यामुळे यातून तिला दुपटीने पैसा मिळतो. अनुष्काच्या घरची परिस्थिती चांगली आहे. यापूर्वी तिच्या घरातील कोणीही शेती व्यवसायात नव्हते. यामुळे तिने सर्वात प्रथम एक एकर शेती घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. परंतु यापूर्वी तिने शेतीसाठी प्रशिक्षण देखील घेतले होते. हे प्रशिक्षण घेऊन तिने कमी उत्पन्नात चांगली शेती कशी करता येऊ शकते हे सर्वांना दाखवून दिले.
शेतीसाठी 90 टक्के अनुदान मिळाले…
अनुष्काने सुरुवातीला एका एकरामध्ये 50 टन इंग्रजी काकडीचे उत्पादन केले होते. तर लाल, पिवळी भोपळी मिरचीचे पीक 35 टन केले होते. एवढेच करून न सांगता तिने इतर भाज्या देखील शेतात लावल्या. आणि शेतीचा व्यवसाय पुढे वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आणि प्रयत्न करण्यास सुरुवात केली. आज तिच्या याच प्रयत्नांना चांगले यश मिळाले आहे. अनुष्का आपल्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीने हिरव्या भाज्यांची लागवड करते. तिचे हे काम पाहून तिला फलोत्पादन विभागाकडून ड्रॉप मोअर पीक अंतर्गत 90 टक्के अनुदान देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे शेती व्यवसायातून अनुष्काने 20 पेक्षा अधिक जणांना रोजगार दिला आहे.