सतत अपयश आल्यानंतरही मानली नाही हार; ओशिन शर्मा झाल्या सहाय्यक आयुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनेक तरुणांना MPSC आणि PSI परीक्षा देताना अपयश येते. अपयश आल्यानंतर काहीजण खचून जातात तर काहीजण पुन्हा नव्याने प्रयत्न करतात. अपयश माणसाला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करते आणि बळ देते. माणूस अपयशातून शिकतो आणि पुढे जाण्याची प्रेरणाही घेतो. असे हिमाचल प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ओशिन शर्मा यांनी दाखवून दिले आहे. हिमाचल प्रदेशातील नागगर कुल्लू येथे सहाय्यक आयुक्त (BDO) म्हणून कार्यरत असेलेल्या ओशिन यांची पाहूया प्रेरणादायी यशोगाथा….

इतरांप्रमाणे आपणही सरकारी निकृत सामील व्हावे अशी इच्छा ओशिन यांना झाली. मग त्यांनी सरकारी नोकरीसाठी अनेक प्रयत्न केले. अनेक परीक्षा दिल्या. एकदा, त्यांची निवड सिव्हिल सर्व्हिसेससाठीही फक्त 5 क्रमांकांनी मागे पडली. मात्र, त्यांनी हार मानली नाही आणि 2019 मध्ये त्यांची बीडीओसाठी निवड झाली. बीडीओ झाल्यानंतरही ओशिन यांनी आपली तयारी सोडली नाही आणि शेवटी दुसऱ्या प्रयत्नात हिमाचल प्रशासकीय सेवेत (एचएएस परीक्षा) निवड झाली.

Oshin Sharma

घरी प्रशासकीय सेवेचे धडे

ओशिन शर्मा यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्यांचे कुटुंबीय सुशिक्षित आहे. कुटुंबात अभ्यासासाठी चांगले वातावरण होते. ओशिन हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील असून त्या शिमल्यात वाढलय. त्यांचे वडील भुवनेश शर्मा नायब तहसीलदार आहेत आणि आई कांगडा सेटलमेंट ऑफिसरच्या पीए म्हणून कार्यरत आहेत.

असा प्रकारे स्वप्न उतरवले सत्यात

ओशिन यांनी सुरुवातीला डॉक्टर होण्याचे स्वप्न पौराहिले होते. त्यानंतर कॉलेजच्या दिवसात त्या विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाल्या. पण नंतर त्यांची अभ्यासात असलेली आवड पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नागरी सेवांसाठी तयारी करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी त्याची तयारी सुरू केली. ओशीन यांनी पंजाब विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आणि स्पर्धा परीक्षा दिली.

Oshin Sharma

चित्रपटाची मिळाली होती ऑफर –

सोशल मीडियात ऍक्टिव्ह असल्यामुळे ओशिन यांच्याकडून त्यांचे फोटो इन्स्ट्राग्राम, फेसबुकवर टाकले जात असे. तसे सुंदर दिसत असल्यामुळे ओशिन यांना महाविद्यालीन काळात चित्रपटांमध्ये जाण्याच्या ऑफरही आल्या होत्या. पण त्यांच्या घरच्यांना ते आवडले नाही. त्यामुळे त्या चित्रपट क्षेत्रात नाही गेल्या.