Success Story : शेतकरी मित्राला सलाम ! स्ट्रॉबेरीच्या शेतीतून कमवले लाखो रुपये, जाणून घ्या काय केले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील शेतकरी शेतात वेगवगेळ्या पिकांची लागवड करत असतात. व यातून उत्पन्न मिळवत असतात. मात्र अनेकवेळा शेतकऱ्यांना शेती परवडत नाही असे ते सांगतात. यामागे नेमके काय कारण असू शकते याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहे. तसेच या मित्राने स्ट्रॉबेरी शेतीतून कसे लाखोंचे उत्पन्न घेतले हे तुम्ही जाणून घ्या.

पंजाबमधील फरीदकोटमधील मनिसिंगवाला या छोट्याशा गावातील रहिवासी प्रदीप सिंह आणि त्यांची पत्नी या शेतकऱ्यांपैकी एक आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. आता या पिकातून त्यांना दर 6 महिन्यांनी 5 लाख रुपयांचा नफा मिळू लागला आहे.

स्ट्रॉबेरीची शेती कशी सुरू झाली?

प्रदीप सिंह सांगतात की, जेव्हा स्ट्रॉबेरीच्या लागवडीची कल्पना सुचली, तेव्हा सर्वप्रथम ते त्या ठिकाणी पोहोचले जिथे त्याचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते आणि त्याबद्दल माहिती मिळवली. महाराष्ट्रातील पुणे शहरातून स्ट्रॉबेरीचे चांगले पीक असलेली रोपे विकत घेतली. तसेच शेताच्या थोड्या भागात लागवड केल्यास चांगले परिणाम मिळतात. यानंतर आम्ही स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. माझ्या या कामात माझ्या पत्नीचाही मोठा वाटा आहे. खर्च काढल्यानंतर 5 लाखांचा नफा होतो. असे त्यांनी सांगितले आहे.

तसेच प्रदीप सिंह पुढे सांगतात की, माझी पत्नी स्ट्रॉबेरी चांगली पॅक करते. मी बाजारात नेतो. तिथे सर्व माल विकला जातो. एकूण खर्च काढल्यानंतर त्यांना 5 लाख रुपयांचा नफा होतो. इतर पिकांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. याशिवाय आम्ही शेतात स्ट्रॉबेरीसह मिरची आणि कांद्याचीही लागवड केली आहे.

प्रदीप सिंह यांनी मुलांसाठी दिला सल्ला

प्रदीप सिंह यांनी इतर शेतकऱ्यांना पारंपरिक शेती सोडून फायदेशीर पिके घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शेतकऱ्यांची मुले परदेशात जाणे थांबतील. शेतकऱ्याची पत्नी कुलविंदर कौर यांनी सांगितले की, माझ्या पतीने ही स्ट्रॉबेरीची लागवड माझ्यासोबत सुरू केली. त्यांनी मला शेतात काम करायला सांगितल्यावर मी लगेच हो म्हणाले. मी पण एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि लहानपणापासून शेतात राहते. मला शेतात काम करायला हरकत नाही. सध्या स्ट्रॉबेरीच्या शेतीतून गावातील इतर महिलांनाही आम्ही रोजगार देत आहोत. असे यावेळी त्यांनी सांगितले आहे. थोडक्यात ही शेती शेतकऱ्यांना खूप परवडणारी आहे.