ISRO ची मोठी कामगिरी! सूर्याच्या अभ्यासासाठी ADITYA-L1 चे यशस्वी प्रक्षेपण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर आज सूर्याचा अभ्यास करण्यासाठी श्रीहरीकोटाच्या प्रक्षेपण केंद्रामधून ADITYA-L1 चे लॉन्चिंग करण्यात आले आहे. सकाळी 11:50 मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने ADITYA-L1 ने अवकाशात झेप घेतली आहे. ही मोहीम चंद्रयान 3 प्रमाणेच महत्त्वाची आहे. ADITYA-L1 मोहिमेच्या माध्यमातून सूर्याचा आणि तेथील वातावरणाचा अभ्यास केला जाईल. या मोहिमेंतर्गत इस्त्रोच्या हाती मोठी माहिती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुरुवातीचे काही दिवस ADITYA-L1 पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे. त्यानंतर तो पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत अंतराळात असणाऱ्या एल-1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. याठिकाणी पोहोचण्यासाठी त्याला सुमारे चार महिने लागतील. त्यानंतर आदित्य उपग्रहाला एल-1 पॉइंटभोवती असणाऱ्या हेलो ऑर्बिटमध्ये प्रस्थापित केले जाईल. तिथे गेल्यानंतर ADITYA-L1 च्या मार्फत सूर्याचा अभ्यास सुरु केला जाईल. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोने इस्रो ADITYA-L1 मोहीम फत्ते करण्यासाठी तयार झाल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

दरम्यान, आज लॉन्च करण्यात आलेले आदित्य-L1 मिशन भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या मिशनच्या अंतर्गत सूर्याचा अभ्यास केला जाईल. सूर्यावरील हवामानाची गतिशीलता, सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम आणि ओझोन थर अशा बऱ्याच गोष्टींचे संशोधन या मिशनअंतर्गत केले जाईल. त्यामुळे चंद्रयान 3 नंतर आदित्य-L1 मिशनकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.