Sudarshan Setu : देशातील सर्वात लांब केबल पुलाचे मोदींनी केलं उद्घाटन; पहा काय आहेत खास गोष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sudarshan Setu : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात विविध विकास प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. देशात इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकारने सार्वधिक फोकस ठेवण्यात आलाय. त्यानुसार, रस्ते, नवनवीन पूल यांच्या कामाचा सपाटा आपल्याला पाहायला मिळालं. मागील महिन्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबईतील अटल सेतूचे उदघाटन झालं होत. त्यानंतर आता देशातील देशातील सर्वात मोठ्या केबल पुलाचे उदघाटन आज मोदींच्या हस्ते करण्यात आलं. सुदर्शन सेतू असे या ब्रिजचे नाव असून हा पूल ओखा मुख्य भूभाग आणि बायत द्वारका बेटाला जोडतो.

आज सकासकाळीच पंतप्रधान मोदी त्यांचे होम टाउन असलेल्या गुजरातमध्ये पोचले. बेट द्वारका मंदिरात पोहोचून त्यांनी दर्शन व पूजा केली. यानंतर मोदींनी नव्याने बांधलेल्या सुदर्शन पुलाचे (Sudarshan Setu) उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील हे सुद्धा उपस्थित होते. सुमारे 980 कोटी रुपये खर्चून बांधलेला सुदर्शन सेतू पूल ओखा-बेट द्वारका सिग्नेचर ब्रिज म्हणूनही ओळखला जातो. द्वारकाधीश मंदिरात येणाऱ्या पर्यटकांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सुदर्शन सेतूची एकूण लांबी 2.32 किमी एवढी असून हा भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल म्हणून ओळखला जात आहे.

काय आहेत खास गोष्टी – (Sudarshan Setu)

सुदर्शन पुलाच्या बांधकामासाठी ९७८ कोटी रुपये खर्च आला आहे.

सुदर्शन पुलाची ज्याप्रकारे रचना करण्यात आली आहे ते त्याच खासपण आहे. यामध्ये श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोक आणि दोन्ही बाजूंना भगवान कृष्णाच्या प्रतिमांनी सजवलेला फूटपाथ आहे. त्यामुळे भक्तांना श्लोक वाचता येणार आहेत.

फूटपाथच्या वरच्या भागात सौरऊर्जेचे पॅनल बसवण्यात आले असून, त्यातून एक मेगावाट वीजनिर्मिती होते. या पुलामुळे द्वारका ते भेत-द्वारका दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांची ये-जा तर सोप्पी होणारच आहे. याशिवाय महत्वाचे म्हणजे वेळेची बचत सुद्धा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये या पुलाची पायाभरणी केली होती.

ओखा- बेट द्वारका सिग्नेचर ब्रिज बांधण्यापूर्वी भाविकांना बेट द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरापर्यंत जाण्यासाठी बोटीच्या वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते, आता मात्र या ब्रिजमुळे आरामात मंदिरात जाता येईल.