Agriculture News : आता ऊसतोड कामगार घेऊ शकणार सर्व सरकारी योजनांचा फायदा; त्यासाठी आजच करा ‘हे’ काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांची संख्या आणि त्यासंबंधीत प्रश्न मोठे आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार सतत काहीना काही उपाय योजना आखताना दिसते. आता या ऊसतोड कामगारांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सरकारने आणखीन एक पाऊल उचलले आहे. राज्य सरकारकडून आता ऊसतोड कामगारांना ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आजच करा ‘हे’ काम

सरकार शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी अनेक योजना राबवत असते. आता सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. हे अँप खास महाराष्टरातील शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आले असून यावरून तुम्ही घरी बसून कोणत्याही शासकीय योजनेला अर्ज करू शकता. यासोबतच रोजचे बाजारभाव तुम्हाला Hello Krushi अँपवर पाहता येतात. तसेच जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे, हवामान अंदाज जाणून घेणे, खाते बीबियाणे यांची खरेदी विक्री करणे अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना येथे पूर्णपणे मोफत देण्यात येतात. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi डाउनलोड करून घ्या.

राज्यातील ऊसतोड कामगार रोज वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात असतात. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राहणीमानात सुधारणा होण्यासाठी तसेच त्यांना सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना सरकारी ओळखपत्र देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करून विहित नमुन्यातील ओखळपत्र प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.

ही नोंदणी केल्यानंतर ऊसतोड कामगाराला ओळखपत्र प्राप्त होईल. यामुळे त्यांना सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल. परंतु या नोंदणीसाठी काही बाबी आवश्यक असणार आहेत. त्यानुसार उसतोड कामगार हा किमान ३ ते त्यापेक्षा जास्त काळ ऊसतोडणीचे काम करणारा असावा. अशा ऊसतोड कामगारांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन नोंदणी करावी.

दरम्यान राज्यातील ऊसतोड कामगारांपर्यंत सरकारी योजना पोहचत नाहीत. तसेच त्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न, राहणीमानाच्या अडचणी अशा अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे गेल्या अर्थसंकल्पीय सभेत राज्य शासनाने ऊसतोड कामगार महामंडळाला १३५ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली होती. यातून मंडळाने कामगारांचे हित राखत त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना अमलात आणाव्या हा हेतू मांडण्यात आला होता. त्यानंतर आता मंडळाने उसतोड कामगारांना ओळखपत्र काढून घेण्याचे आवाहन केले आहे.