Sukanya Samriddhi Yojana : आता मुलींच्या भविष्याची चिंता सोडा!! सरकारने आणली आकर्षक योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sukanya Samriddhi Yojana मुलगी झाली कि ती लहान असल्यापासूनच तिच्या शाळेपासून ते लग्नासाठीपर्यंत सर्वकाही तयारी करण्यास सुरुवात केली जाते. तिच्या लग्नासाठी पैसे जमा करणे हा यातला सर्वांत महत्वाचा भाग असतो. म्हणूनच मुलींच्या पुढील भविष्याचा विचार करत केंद्र सरकारने एक योजना अमलात आणली आहे. या योजनेचे नाव सुकन्या समृध्दी योजना असून सध्या ती खूपच लोकप्रिय ठरत आहे. मुख्य म्हणजे या योजनेचा लाभ अनेकजण घेत आहेत. या योजनेमुळे तुम्ही आपल्या मुलींसाठी एका दीर्घ काळासाठी खाते तयार करु शकता. या खात्यात छोटी गुंतवणूक करुन मुलीच्या भविष्यासाठी पैसे जमा करु शकता.

कधी करू शकता गुंतवणूक ?

सुकन्या समृध्दी योजनेचा (Sukanya Samriddhi Yojana) लाभ तुम्ही मुलीचा जन्म झाला कि घेऊ शकता. एखाद्या व्यक्तीने जर मुलीचा जन्म झाल्याझाल्या तिच्या नावे खाते तयार केल्यास ती व्यक्ती तिच्या नावे १५ वर्षे पैसे जमा करु शकते. तसेच मुलगी १८ वर्षांची झाली की मॅच्युरिटी रकमेच्या ५० टक्के रक्कम तुम्हाला  काढता येते. पुढे उर्वरित रक्कम मुलगी २१ वर्षांची झाली की आपण काढू शकतो. ही योजना एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. या योजनेसाठी सरकारकडून दर तीन महिन्याला व्याजदर निश्चित करण्यात येतो. सध्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे तुम्हाला या योजनेसंबंधीत वार्षिक व्याज ८ टक्के मिळू शकते.

किती रुपये मिळतील? (Sukanya Samriddhi Yojana)

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडणे आवश्यक आहे. तुम्ही जर या खात्यात दरमहा १२,५०० टाकले तर तुम्हाला एका वर्षात १.५ लाख रुपये मिळू शकतात. म्हणजेच सलग १५ वर्ष तुम्ही गुंतवणूक केल्यास २२,५०,००० रुपये जमा होतील. या रकमेवर कोणताही कर लावला जात नाही. याचबरोबर जर ही रक्कम मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर काढण्यात आली तर तिला मॅच्युरिटी रक्कम ६३ लाख ७९ हजार ६३९ रुपये मिळू शकते. इतकेच नव्हे तर, या योजनेत (Sukanya Samriddhi Yojana)  तुम्ही २२,५०,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला व्याजाचे उत्पन्न ४१,२९,६३४ मिळू शकतात.