Summer Tips For Farmers | शेतकऱ्यांनो, उन्हात शेती करताना घ्या ‘ही’ काळजी; आरोग्य राहील सुरक्षित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Summer Tips For Farmers उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. यावर्षी नेहमीपेक्षा जास्त तापमान वाढ झालेली आहे. तापमान वाढ जरी झाली असली, तरी शेतकऱ्यांना मात्र उन्हातच शेतात काम करावे लागते. पण या अतिउन्हामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यविषयक अनेक समस्या उभ्या राहतात. त्यामुळे शेतात काम करताना काही गोष्टींची शेतकऱ्यांना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्या आरोग्याचे मोठे नुकसान होईल.

उन्हाळ्यामध्ये (Summer Tips For Farmers) डीहायड्रेशनची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जाताना भरपूर पाणी घेऊन जावे. आणि सारखे पाणी प्यावे जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे नारळ पाणी आणि ORS यांसारख्या गोष्टी देखील देऊ शकतात. डिहायड्रेशन टाळण्यासाठी दर तासाला किमान एक ते दोन ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना हलक्या रंगाचे सैल आणि सुती कपडे घालावे. त्याचप्रमाणे डोक्यावरती टोपी किंवा टॉवेल बांधावा. जेणेकरून तुम्हाला उन्हाचा जास्त चटका सहन करावा लागणार नाही. आणि तुमच्या स्किनचे देखील नुकसान होणार नाही.

त्याचप्रमाणे शेतात काम करताना दुपारी 12 ते 3 दरम्यान काम करणे सहसा टाळावे. या ऐवजी तुम्ही सकाळी सकाळी शेतात जाऊन काम करू शकता. किंवा संध्याकाळी 4 नंतर शेतात काम करू शकता. दिवसभर उन्हात काम करायला लागणार असल्याने तुम्ही हलका आणि पौष्टिक आहार घ्या. जेणेकरून तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकून राहील तसेच उन्हाळ्यात भरपूर फळांचे आणि भाज्यांचे सेवन करा. सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी तुम्ही सनस्क्रीमचा वापर देखील करू शकता.

शेतात काम करताना उन्हाचा अंदाज घेऊनच काम करा. अन्यथा उन्हाचा जास्त चटका लागला, तर तुमच्या शरीरासाठी ते घातक ठरू शकते. त्याचप्रमाणे उन्हामुळे तुमच्या आरोग्याची काही समस्या जाणवल्या तर तुम्ही लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि इलाज घ्या.