Summer Tips | उन्हाळ्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स, डिहायड्रेशनला करा रामराम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Summer Tips | मार्च महिना जसजसा संपत आलाय तसतशी उन्हाची झळ देखील वाढत चाललेली आहे. उन्हाळ्याचा ऋतू सुरू झाल्यामुळे सर्वत्र जास्त प्रमाणात उष्णता जाणवत आहे. अगदी सकाळी 10 वाजल्यापासूनच कडक ऊन लागते. परंतु या उन्हाळ्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होतो. त्यामुळे उलटी होणे, चक्कर येणे, किडनीच्या समस्या यांसारखे अनेक आजार होतात.

त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अगदी आपले शरीर, पोट त्याचप्रमाणे आपली त्वचा या सगळ्यांची देखील काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा उष्णतेमुळे आपल्यावर वाईट परिणाम होतो. अगदी या उष्माघातामुळे अनेक लोकांचे जीव गेलेल्या घटना देखील समोर आलेल्या आहेत. तर आज आपण या उन्हाळ्यामध्ये आपली कोणती (Summer Tips) काळजी घ्यावी जेणेकरून आपण निरोगी राहू हे जाणून घेऊया.

उष्णतेपासून वाचण्यासाठीच्या टिप्स | Summer Tips

  • उन्हाळ्यात सगळ्यात जास्त डिहायड्रेशनचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या काळात आपण जास्तीत जास्त पाणी पिणे खूप गरजेचे आहे. जास्तीत जास्त पाणी पिल्याने आपली बॉडी हायड्रेट राहते. आणि आपल्याला थकवा जाणवत नाही. त्याचप्रमाणे पाणी पिणे हे आपल्या त्वचेसाठी त्याचप्रमाणे पोटाच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले असते. परंतु अशावेळी आपण फ्रीजमधील थंड पाणी न पिता नॉर्मल पाणी पिणे गरजेचे आहे.
  • घरातून बाहेर पडताना नेहमी थोडेसे खाऊन जा आणि सोबत एक पाण्याची बॉटल ठेवा. कारण उन्हामुळे आपल्याला चक्कर येण्याची त्याचप्रमाणे उलटी होण्याची देखील शक्यता असते.
  • घरातून बाहेर निघताना आपले डोके त्याचप्रमाणे हात पूर्ण कव्हर होईल असे कपडे घाला. त्याचप्रमाणे स्कार्फने तोंड बांधले तरी चालेल. त्यामुळे तुमचा चेहरा उष्णतेपासून वाचेल. त्याचप्रमाणे डोळ्यांवर गॉगल घातल्याने देखील तुम्हाला फायदा होईल.
  • उन्हाळ्यात घरात बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे खूप गरजेचे असते. त्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण होते. आपण जर सन स्क्रीन न लावता बाहेर गेलो, तर आपल्या चेहऱ्यावर उन्हामुळे फोड येण्याची शक्यता असते.
  • उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त रसयुक्त पदार्थ फळे खाल्ली पाहिजे. कलिंगड, टरबूज, खरबूज, संत्री यांसारखी फळे खाल्ल्याने आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहते.
  • त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणामध्ये फळांचा रस, दही, मठ्ठा ताक, जलजीरा, लस्सी, कैरीचे पन्हे हे यांसारख्या गोष्टी खा.
  • उन्हाळ्यामध्ये शक्यतो जास्त जेवण करू नका हलके आणि पचेल असे जेवण करा.
  • उन्हाळ्यात घरात मऊ आणि सुती कपडे घाला जेणेकरून तुम्हाला गरम होणार नाही.आणि तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होणार नाही.
  • कडक उन्हातून तुम्ही बाहेरून आल्यावर लगेच एसीमध्ये जाऊ नका. असे केल्याने तुम्हाला तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते.
  • उन्हातून आल्यावर लगेच थंड पाण्याने अंघोळ करू नका. कारण बाहेरून आल्यावर तुमच्या शरीरातील उष्णतेची पातळी जास्त असते. अचानक त्यावर थंड पाणी पडले तर आपल्या शरीरातील उष्णतेची पातळी बिघडते आणि त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.
  • शक्यतो उन्हाळ्यात तळलेले मसालेदार पदार्थ खाणे टाळा. यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते. कारण की, मसालेदार आणि तळलेल्या पदार्थांमध्ये खूप उष्णता असते आणि त्यामुळे तुमच्या पोटात जळजळ होते.
  • उन्हात बाहेर गेल्यावर वेळोवेळी ग्लुकोजचे सेवन करा. त्याचप्रमाणे फळांचा रस देखील प्या जेणेकरून तुमचे शरीरही थंड होईल आणि नेहमीच हायड्रेट राहील.