Summer Tips | उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो, उष्णतेपासून राहाल लांब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Summer Tips | आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारचे आजार होतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला देखील अनेक गोष्टी गरजेच्या असतात अशा वेळी शरीराचे तापमान वाढते आणि आपल्या शरीरातील उष्णता वाढते. तेव्हा आपल्या शरीराला खूप गरजेचे असते. त्यामुळे आता या उन्हाळ्यामध्ये स्वतःची कशाप्रकारे काळजी घ्यायची जेणेकरून तुमचे मन आणि शरीर देखील शांत होईल आणि तुम्ही आनंदी राहू शकता हे पाहूया.

उन्हाळी आहार खा

उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला ठेवणे खूप गरजेचे असते. त्यामुळे अशावेळी काही फळ खाणं खूप गरजेचं असतं. यावेळी बेरी, चेरी, टोमॅटो, पीच आणि टरबूज यांसारखी पाणी युक्त फळे खाणे खूप गरजेचे असते. यामुळे आपल्या शरीराला कॅलरीज देखील मिळतात आणि आपले शरीर देखील हायड्रेट राहते.

हायड्रेशनला प्राधान्य द्या

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात तापमान वाढते. अशा वेळी आपल्या बॉडीला देखील पाण्याची जास्त गरज असते. त्यामुळे दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्या. त्याचप्रमाणे इतर हायड्रेटिंग देखील घ्या. लिंबू सरबत नारळाचे पाणी, ताक, काकडी यांसारखे पदार्थ जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे शरीर देखील थंड राहील.

कुलिंग प्राणायाम करा | Summer Tips

प्राणायाम केल्याने आपल्याला खूप फायदा होतो. त्यामुळे काही असे प्राणायाम आहे. जे आपल्या शरीरातील उष्णता बाहेर टाकण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे आपल्याला या कुलिंग प्राणायामाचा सराव केला पाहिजे. त्याचप्रमाणे नाकपुडी ऊर्जा संतुलित राहण्यासाठी आणि विश्रांती वाढवण्यासाठी हे व्यायाम करणे गरजेचे आहे.

थंड शॉवरला प्राधान्य द्या

दिवसातून दोन वेळा तरी थंड शॉवर घेणे गरजेचे आहे. थंड शॉवर घेतल्याने आपल्याला उष्णतेपासून आराम मिळतो. यामुळे आपल्या शरीराचे तापमान कमी होते. आणि आपल्याला फ्रेश वाटते. तसेच शक्य असल्यास पोहणे किंवा वॉटर एरोबिक्स यांसारख्या गोष्टी करा त्यामुळे आपल्या शरीरावर जास्त ताण पडत नाही.

सुती कपडे वापरा

उन्हाळ्यामध्ये आपल्याला योग्य कपडे निवडणे आणि वापरणे देखील खूप गरजेचे आहे. त्यामुळे यासारख्या दिसतात सुती कपडे घाला. जेणेकरून उष्णतेचा संपर्क कमी होईल त्याचप्रमाणे जास्त ऊन असल्यास घरातच रहा. बाहेर जाताना सुती कपडे घाला त्यामुळे तुमच्या पर्यंत जास्त उष्णता पोहोचणार नाही.