Summer Vacation Travel Plan | उन्हाळी सुट्टीत मुलांसोबत करा फॅमिली ट्रिप प्लॅन; रेल्वेने आणली खास ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Summer Vacation Travel Plan उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना सुरुवात झालेली आहे. मुलांना जवळपास 45 दिवस सुट्ट्या असतात. आणि या काळात त्यांना दुसरीकडे कुठेतरी फिरायला जायचे असते. यावेळी आई-वडील त्यांना त्यांच्या आजी-आजोबांकडे किंवा इतर नातेवाईकांकडे सोडतात. परंतु तुम्हाला जर मुलांना इतर कुठेतरी घेऊन फिरायला द्यायचे असेल, तर अनेकवेळा ते परवडत नाही. (Summer Vacation Travel Plan) परंतु आता याबाबत कोणतीही काळजी करू नका. कारण भारतीय रेल्वे तुम्हाला यासाठी आता मदत करणार आहे.

भारतीय रेल्वे दरवर्षी कौटुंबिक टूर हे पॅकेज आणत असते. ज्याद्वारे तुम्ही प्रवास खूपच स्वस्तामध्ये करू शकता. आणि तुमचा प्रवास आरामदायक देखील होणार आहे. आता आपण भारतीय रेल्वेच्या कौटुंबिक टूर पॅकेजच्या कमी बजेट असणाऱ्या काही खास ऑफर जाणून घेणार आहोत. जेणेकरून या उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन छान छान ठिकाणी भेट देऊ शकता. आणि तुमची उन्हाळ्याची सुट्टी तुम्ही एन्जॉय करू शकता. या उन्हाळ्यात तुम्ही भारतीय रेल्वेच्या टूर पॅकेजमधून प्रवास करण्याचा प्लॅन करू शकता. या पॅकेजमध्ये तुम्हाला एकच तिकीट बुक करावे लागेल. आणि त्यानंतर भारतीय रेल्वे तुमच्या प्रवाशाची संबंधित सगळी तयारी करते.

चेन्नईपासून सुरू होणारे टूर पॅकेज | Summer Vacation Travel Plan

चेन्नईपासून सुरु होणारे हे पॅकेज गुलमर्ग, पहलगाम सोनमर्ग आणि श्रीनगर टूर पॅकेज आहे. हे पॅकेज पाच रात्री आणि सहा दिवसांचे आहे. हे पॅकेज 30 मे पासून सुरू होत आहे दोन लोकांसोबत प्रवास केल्यास प्रत्येक व्यक्तीचे पॅकेज रुपये 53 हजार 50 एवढे आहे. मुलांसाठी तुम्हाला 41 हजार रुपये वेगळे द्यावे लागतील.

त्याचप्रमाणे चेन्नई ते चंदीगड मनाली आणि शिमला टूर

हे पॅकेज सहा रात्री आणि सात दिवसांचे पॅकेज आहे. हे पॅकेज 25 एप्रिल सुरू होणार आहे. दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्तीला 49 हजार रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे मुलांसाठी तुम्हाला 39 हजार रुपये वेगळे भरावे लागतील.

चेन्नई गुलमर्ग, पहलगाम आणि सोनमर्ग टूर पॅकेज

रेल्वेचे हे खास टूर पॅकेज 25 एप्रिलपासून सुरू होत आहे. दोन लोकांसोबत प्रवास करत असताना प्रत्येक व्यक्तीस 45 हजार 500 रुपये एवढी फी असेल. त्याचप्रमाणे मुलांसाठी तुम्हाला 23 हजार 500 रुपये द्यावे लागतील.

हैदराबादपासून सुरू होणारी टूर पॅकेज

हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचे आहे. 24 एप्रिलपासून या टुरला सुरुवात होत आहे. या पॅकेजमध्ये पर व्यक्ती 52 हजार 930 रुपये आहेत. त्याचप्रमाणे मुलांसाठी तुम्हाला 31 हजार 420 रुपये वेगळे द्यावे लागतील.

हैदराबादहून लडाख-लेह टूर पॅकेज

हे खास पॅकेज 6 रात्री आणि 7 दिवसांचे आहे. 21 मे पासून या पॅकेजला सुरुवात होत आहे. दोन लोकांसोबत प्रवास करताना प्रति व्यक्ती 60 हजार 750 रुपये एवढी फी आहे, तर मुलांसाठी एक 39945 एवढी फी आहे.

लखनौपासून सुरू होणारी टूर पॅकेज

लखनऊ ते चंदीगड मनाली आणि शिमला टूर पॅकेज हे टूर पॅकेज सात रात्री आणि आठ दिवसांसाठी आहे. मे ते जून महिन्यात तुम्ही या पॅकेजसाठी ग्रुप करू शकता. प्रत्येक व्यक्तीला या पॅकेज मध्ये 45 हजार रुपये एवढे फी द्यावी लागेल तर मुलांसाठी 16 हजार रुपये वेगळे द्यावे लागतील.

लखनौ येथून गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर टूर पॅकेजेस

हे पॅकेज 24 एप्रिल पासून सुरू होणार आहे. या पॅकेजमध्ये प्रत्येक व्यक्तीला 48 हजार 300 रुपये भरावे लागतील, तर मुलांसाठी 27 हजार पाचशे रुपये एवढे वेगळे पैसे द्यावे लागतील.

या उन्हाळ्यात जर तुम्ही ही बाहेर कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर हे पॅकेज तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहेत. यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देखील देतील. त्याचप्रमाणे एकदा पॅकेज बुक केल्यावर तुम्हाला प्रवासाचे कोणतेही टेन्शन राहणार नाही. भारतीय रेल्वे अंतर्गत सर्व सुविधा केली जाईल.