हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sun Temples In India) सजीवांच्या आयुष्यात सर्व्ह देवतेचे विशेष महत्व आहे. न केवळ शास्त्र तर विज्ञानाने देखील सूर्य देवाच्या अस्तित्वाची गरज मान्य केली आहे. मानवी जीवनासह वनस्पतींना अन्ननिर्मितीसाठी तसेच वाढीसाठी सूर्याच्या किरणांची आवश्यकता असते. सूर्य हा सर्वात मोठा आणि महत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे हिंदू धर्मातदेखील नवग्रहांमध्ये सूर्य देवतेचे विशेष स्थान आहे.
देशभरात काही ठिकाणी सूर्यदेवतेची भव्य मंदिरे देखील उभारण्यात आली आहेत. जी पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येत असतात. या मंदिरांमध्ये सूर्य देवतेची पूजा केली जाते. त्यांच्या कृपादृष्टीसाठी त्यांचे आभार मानले जातात. ही मंदिरे केवळ पूजा आणि साधनेसाठी महत्वाची नव्हे तर प्राचीन आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष स्थान प्राप्त असलेली मंदिरे आहेत. यांतील काही आध्यात्मिक रहस्ये दडलेल्या मुख्य सूर्यमंदिरांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
1. कोणार्क सूर्य मंदिर (Sun Temples In India)
सूर्यदेवत्याचे कोणार्क येथील मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. ओडिशात असलेले हे कोणार्क सूर्य मंदिर पहायला कायम पर्यटक येत असतात. असे सांगितले जाते की, या मंदिराची स्थापना भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब याने केली होती. पुढे १३ व्या शतकात नरसिंहदेवाने या मंदिराची विशिष्ट स्वरूपात उभारणी केली. हे मंदिर त्याचा आकार आणि कारागिरीसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराची खासियत अशी की, सूर्योदय होताच पहिला किरण या मंदिराच्या मुख्य दरवाजावर पडतो. यामागील रहस्य आजपर्यंत कुणालाच कळलेलं नाही.
2. बिहारच्या औरंगाबादमधील सूर्य मंदिर
बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात असलेले सूर्य देवाचे मंदिर स्वतःच अनोखे आहे. (Sun Temples In India) या मंदिराचा दरवाजा पूर्वेऐवजी पश्चिमेकडे असून जेथे सात रथांवर स्वार होऊन सूर्यदेवाच्या ३ रूपांचे दर्शन होते. येथील धार्मिक मान्यतेनुसार, एका रात्रीत या सूर्यमंदिराचा दरवाजा आपोआप दुसरीकडे वळविण्यात आला होता. हे मंदिर न केवळ अद्भुत मात्र चमत्कारिक रहस्याचे विशेष स्थान मानले जाते.
3. बिहारमधील बेलौर सूर्य मंदिर
बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात बेलौर गावाच्या पश्चिम आणि दक्षिण टोकाला बेलौर सूर्य मंदिर आहे. जे अत्यंत प्राचीन असून त्याकाळी असलेल्या राजाने बांधलेल्या ५२ तलावांपैकी एकाच्या मध्यभागी बांधलेले आहे. (Sun Temples In India) या मंदिराची खासियत अशी आहे की, या ठिकाणी खऱ्या मनाने छठ व्रत पाळणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.
4. मोढेराचे सूर्य मंदिर
गुजरातमधील मोढेरा स्थित सूर्य मंदिर त्याच्या वास्तुकलेच्या कारागिरीची ओळखले जाते. असे सांगितले जाते की, सोलंकी वंशाचा राजा भीमदेव प्रथम याने १०२६ मध्ये हे मंदिर बांधले होते. जे दोन भागात बांधलेले होते. याचा पहिला भाग गर्भगृहाचा तर दुसरा भाग सभामंडपाचा आहे. (Sun Temples In India) त्याचसोबत सूर्योदयावेळी सूर्याची किरणे थेट गर्भगृहात पडतील, याची विशेष काळजी घेऊन या मंदिराची रचना करण्यात आली आणि तसेच हे मंदिर उभारले गेले. त्यामुळे अद्भुत अनुभूतीसाठी या मंदिराला एकदा तरी अवश्य भेट द्या.
5. आंध्र प्रदेशातील सूर्यनारायण मंदिर
आंध्र प्रदेशातील अरसावल्ली गावात पूर्वेच्या दिशेला साधारण १ किलोमीटर अंतरावर हे सूर्यनारायण मंदिर आहे. जे सुमारे १३०० वर्षे जुने असून येथे भगवान सूर्य नारायण आणि त्यांची पत्नी उषा व छाया यांची पूजा केली जाते. या मंदिराची खासियत अशी की, संपूर्ण वर्षातून दोनदा सूर्याचा पहिला किरण थेट मूर्तीवर पडतो. या अनोख्या रहस्यामुळे येथील लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, या मंदिरात भगवान सूर्यदेवाच्या केवळ दर्शनाने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. (Sun Temples In India)