सनबर्न फेस्टिव्हलमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातनचा होता डाव – ATS

0
28
sunburn
sunburn
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे |मागील वर्षी पुण्यात झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातन संस्थेचा हेतू असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संगीताच्या कार्यक्रमात केला जाणारा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर आणि गोंगाट हे हिंदूविरोधी असल्याचं सनातन मानते. त्याचाच भाग म्हणून २०१७ साली झालेल्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता. विशेष न्यायालयातील न्यायाधीश समीर अडकर यांनी ताब्यात घेतलेल्या पाचही आरोपींची पोलीस कोठडी आणखी ७ दिवस वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. वैभव राऊत, सुधांवा गोंधळेकर, शरद कळसकर, अविनाश पवार, श्रीकांत पांगारकर ही अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here