रोहित शर्मा विराट- धोनीपेक्षा चांगला कर्णधार?? सुनील गावस्करानी केलं तोंडभरून कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेत भारतीय संघाने ३-० ने दमदार विजय मिळवल्यानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) तोंड भरून कौतुक केलं आहे. T20 सामन्यात भारतीय संघाला सर्वाधिक विजय मिळवून देण्यात रोहितने धोनीची बरोबरी केली आहे. मात्र रोहितने धोनीपेक्षा कमी सामन्यात संघाचे नेतृत्व करत ही किमया साधली आहे यावरून गावस्कर यांनी रोहितच्या कर्णधारपदाचे गोडवे गायले आहेत.

सुनील गावस्कर म्हणाले, T20 फॉरमॅट मध्ये प्रत्येक कर्णधाराची खऱ्या अर्थाने कसोटी लागते आणि आपल्या नेतृत्वगुणाची परीक्षा असते. मात्र याच फॉरमॅट मध्ये रोहितच्या विजयाची टक्केवारी एमएस धोनी आणि विराट कोहलीपेक्षा जास्त असेल, तर तो किती मजबूत कर्णधार आहे हे दिसून येते. यावेळी गावस्कर यांनी रोहितच्या फलंदाजीचेही कौतुक केलं. ते म्हणाले, खरं तर कोणताही फलंदाज T-20 सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमण करताना दिसेल पण 22/4 अशी धावसंख्या असताना रोहित आणि रिंकू ने क्रिकेटिंग ब्रेन वापरून खेळ पुढे नेला आणि नंतर आक्रमक केलं.

गावस्कर पुढे म्हणाले, 22/4 धावसंख्या असताना त्यावेळी जर आपण आणखी एक- दोन विकेट गमावल्या असत्या तर अवघ्या ८०- ९० धावात आपला संपूर्ण डाव आटपला असता, पण थोडा वेळ मैदानावर घालवून जस जस सेट होईल तस तस इंनिंग पुढे घेऊन जाण्याचे कौशल्य रोहित आणि रिंकूने दाखवलं. अखेरच्या ५ ओव्हर मध्ये १०० धावाही दोन्ही फलंदाजांनी बनवून दाखवल्या असेही गावस्कर यांनी म्हंटल.