Sunil Tatkare : … तर ठाकरे सरकार 8 दिवसही टिकलं नसत; सुनील तटकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sunil Tatkare : 2019 मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर तत्कालीन ठाकरे सरकार ८ दिवस सुद्धा टिकलं नसतं असा दावा करत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. टीव्ही९ मराठीच्या कॉनक्लेव्हमध्ये बोलत असताना तटकरे यांनी अनेक राजकीय उलगाडे केले. अजितदादांनी (Ajit Pawar) भाजपसोबत शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना दादांचा निर्णय योग्य वाटत होता. त्यामुळे जर अजितदादांना त्यावेळी महाविकास आघाडी सरकार मध्ये उपमुख्यमंत्री केलं नसत तर आमदाराच्या मनाचा विस्फोट झाला असता आणि ८ दिवसातच उद्धव ठाकरेंचं सरकार (Thackeray Government) पडलं असत असं तटकरे म्हणाले.

अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं ही मेहरबानी नव्हती. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद दिलं नसतं तर महाविकास आघाडीचं सरकार आठ दिवसही टिकलं नसतं. कारण आमदारांच्या मनात दादांचा निर्णय योग्य होता. तीन पक्षाच्या सरकार पेक्षा दोन पक्षाचं सरकार हवं होतं असं आमदारांना वाटत होते. असे तटकरे यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाचा हेडकाऊंटचा निर्णय आला नसता तर निकाल वेगळा लागला असता. त्यामुळे पक्षाची गरज ओळखून आणि पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं, ती काय कोणाची मेहरबानी नव्हती असं सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी रोखठोकपणे सांगितलं.

उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचं होतं- Sunil Tatkare

यावेळी सुनील तटकरे यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिल्लीत जाऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी अजित पवार आणि अशोक चव्हाण हे दोघेही त्यांच्यासोबत होते. मात्र नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात दहा मिनिटे गुप्त बैठक झाली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्यास तयार झाले होते, मात्र संजय राऊतांनी त्यांना रोखलं आणि ठाकरे भाजपसोबत गेले नाहीत असा दावाही सुनील तटकरे यांनी केला. महत्वाचे म्हणजे संजय राऊत यांनी स्वतःच मला हे सांगितलं आहे असंही त्यांनी म्हंटल. संजय राऊत यांच्या आग्रहखातर एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, अजितदादा, सुनील तटकरे यांची बैठक झाली. या बैठकीत सुद्धा संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबतचे मत व्यक्त केलं होत असं तटकरे यांनी सांगितलं.