हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांना चितपट करण्यासाठी अनेक इच्छुकांनी दंड थोपटलेत…. त्यात काही माजी आमदारांसह अगदीच नवख्या चेहऱ्यांनाही आपण वडगाव शेरीचे आमदार होऊ शकतो, असा कॉन्फिडन्स आलाय… अजित पवार गटात गेल्यामुळे राष्ट्रवादीची एक फळी त्यांच्या विरोधात आहेच… पण महायुतीत आल्याने भाजपच्या इच्छुकांनी लावून धरलंच तर त्यांना तिकीट मिळण्यासही बराच अडसर ठरू शकतो… मतदारसंघात टिंगरेंची ताकद असली तरी त्यांना चितपट करेल, इतकी मतदारसंघात कुणाची धमक आहे? टिंगरेंना भिडू पाहणारे वडगाव शेरीतील इच्छुक उमेदवार कोण? आणि त्यांची ताकद खरंच किती आहे? त्याचाच हा आढावा…
पुण्यातल्या पॉर्शे कार देशात गाजलं… यासोबतच एक नाव या घटनेसोबत चर्चेत आलं ते म्हणजे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचं… टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकत अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला… खरं काय खोटं काय? हा वादाचा मुद्दा… पण पोर्शे पाठोपाठ आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही त्यांची आमदारकी धोक्यात आल्यानं वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचं राजकारण गरमा गरमीचं झालंय… कारण टिंगरे यांचा महायुतीत उमेदवारीसाठी तरी विचार केला जाऊ शकतो का? असा विरोधी सुर उमटत असल्याने टिंगरे यांच्या आमदारकीवर आभाळ आलंय, असं म्हणायला हरकत नाही….
वडगाव शेरीत 2014 ला भाजपच्या जगदीश मुळीक यांनी आपलं वर्चस्व सिद्ध करत पहिल्यांदाच मतदार संघात कमळ खुलवलं… यावेळेस राष्ट्रवादीने बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज सुनील टिंगरे यांनी पक्षातून बंद करत मनसेत आणि अगदी अखेरच्या क्षणी का होईना पण शिवसेनेकडून तिकीट मिळवलच… यावेळी झालेल्या चौरंगी लढतीत मुळीक जिंकले… पण राजकीय अस्थिरतेतून जाऊनही टिंगरे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली… तर राष्ट्रवादीचे पठारे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले… अर्थात हा राष्ट्रवादीच्या बालेकिल्लासाठी मोठा धक्का होता… पण पुढे पुन्हा 2019 च्या निवडणुकीआधी सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करत तिकीट मिळवलं… दुसरीकडे युतीकडून जगदीश मुळीक होतेच.. त्यात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांचा पक्षप्रवेश घडवून आणला… यामुळे मुळीक पुन्हा एकदा कमळ फुलवणार अशा शक्यता असताना सुनील टिंगरे जायंट किलर ठरले… आणि राष्ट्रवादीकडून आमदार झाले…
त्यामुळे प्रत्येक टर्मला चेहरा आणि पक्ष बदलणाऱ्या वडगाव शेरीत यंदा आमदार म्हणून कुणाचा नंबर लागणार? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे… टिंगरे यांच्या कार्यकाळात मतदारसंघाच्या विकासाला खिळ बसल्याचं स्थानिक जनतेचे मत आहे… त्यात राष्ट्रवादीत अजित पवार गटाला दिलेली साथ, इच्छुकांनी थोपटलेले दंड आणि पोर्श कार प्रकरणात डागळलेली इमेज यामुळे सुनील टिंगरे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळेल का? याबाबत मोठं प्रश्नचिन्ह आहे… टिंगरे यांच्यासाठी सर्वात मोठा अडथळा असणार आहेत ते भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक… खरंतर पुणे लोकसभेसाठीच भाजपकडून मुळीक इच्छुक होते… त्यांनी यासाठी बरीच फिल्डिंगही लावली होती… मात्र पक्षाच्या आदेशानुसार दोन पावलं मागे घेत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं… त्यामुळे आता बॅक टू विधानसभा म्हणत त्यांनी वडगाव शेरीतून पुन्हा एकदा आमदारकीसाठी काहीही झालं तरी दावा ठोकलाय…
त्यात 2009 ला राष्ट्रवादीकडून आमदार असलेले बापू पठारे सध्या भाजपात आहेत… आमदार सुपुत्र सुरेंद्र पठारे सध्या आमदारकीसाठी इच्छुक आहेत… त्यामुळे या दांडग्या आणि आपापलं राजकीय प्रभावक्षेत्र असणाऱ्या इच्छुकांची भाऊ गर्दी झाल्यामुळे तिकीट वाटपापासून ते प्रत्यक्ष निकालापर्यंत वडगाव शेरीत राजकारण घासून पाहायला मिळेल… जगदीश मुळीक यांना डावलणं अर्थात भाजपाला महाग पडू शकतं… त्यामुळे ज्याचा आमदार त्याला तिकीट… हे बोलायला जरी सोपं वाटत असलं तरी वडगाव शेरीमध्ये महायुतीसाठी मोठं किचकट असणार आहे… त्यात राष्ट्रवादीकडून शरद पवारांनीही वडगाव शेरीत विशेष लक्ष दिलय.. इच्छुकांपैकीच एकाच्या हातात तुतारी देण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन आहे… त्यामुळे जर महायुतीकडून सुनील टिंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला… तर वडगाव शेरीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते… विशेष करून वडगाव शेरीतून उमेदवारी कोणाला द्यायची, याची सर्वस्वी जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याच खांद्यावर असल्यानं आता ते अजित पवार गटातून की भाजपतून इनकमिंग करत निवडणुक लढवणार? की एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्याला मतदारसंघातून बळ देणार? हे पहावं लागेल…
त्यामुळे सुनील टिंगरे यांचा कार्यक्रम करण्यासाठी जगदीश मुळीक, बापू पठारे, अनिल टिंगरे येणाऱ्या काळात मैदानात दिसू शकतात… त्यामुळे अपेक्षित बंडखोरी, मतांचं होणारं विभाजन, महायुतीतील अंतर्गत संघर्ष, शरद पवार गटाकडे अद्याप नसलेला तगडा उमेदवार आणि विद्यमान आमदारांच्या अंगलट आलेली प्रकरण हे सगळं प्लस करून पाहिलं तर वडगाव शेरीचा यंदाचा निकाल हा अनप्रेडिक्टेबल आणि अनपेक्षित वळण घेणारा असेल, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको… बाकी तुम्हाला काय वाटतं? वडगाव शेरीतून यंदाचा आमदार कोण असेल? टिंगरे, मुळीक, पठारे की आणखी कुणी? वडगाव शेरी चा बालेकिल्ला यंदा कोणत्या राष्ट्रवादीकडे राहील? तुमचं याबद्दलचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा