हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 9 महिन्यांपासून भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अंतराळात अडकले आहेत. पण आता या दोघांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुनीता विल्यम्स अन बुच विल्मोर अखेरी नासाच्या सहकार्याने आणि स्पेसएक्स, अमेरिकी सरकारच्या प्रयत्नांतून पृथ्वीवर परतणार आहे, यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर हे दोघे पृथ्वीवर नेमक्या कोणत्या दिवशी परतणार आहेत हे आज आपण जाणून घेऊयात.
पृथ्वीवर कधी परतणार –
नासाकडून नुकतीच माहिती जारी करण्यात आली आहे की, सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर मंगळवारी, म्हणजेच 18 मार्च 2025 (सायंकाळी ) रोजी पृथ्वीवर परततील. त्यांना फ्लोरिडा येथील समुद्रकिनाऱ्यावर स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सुलद्वारे सुरक्षितपणे उतरवण्यात येईल. यावेळी अमेरिकेचे अंतराळवीर निक हेग आणि रशियाचे अंतराळवीर अलेक्जेंडर गोर्बूनोवही त्यांच्यासोबत पृथ्वीवर परत येतील.
Live Telecast च्या माध्यमातून हा क्षण पाहता येणार –
सर्व जगभरातील लोक Live Telecast च्या माध्यमातून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतील. यानंतर सुनीता विलियम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
पृथ्वीवर येण्याची प्रतीक्षा संपली –
सुनीता विल्यम्स (Sunita Williams)आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासा एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्ससोबत मिळून काम करत आहे. यासाठी स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल वापरण्यात आले . 12 मार्च रोजी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित केले जाणार होते. यामध्ये, स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 अवकाशात पाठवणार होते, ज्यामध्ये 4 अंतराळवीर अंतराळ स्थानकासाठी रवाना होणार होते. मात्र काही तांत्रिक त्रुटींमुळे क्रू-10 ची मोहीम रद्द केली गेली होती. त्यामुळे सुनीता विलियम्स अन बुच विल्मोर याना अजून प्रतीक्षा करावी लागली होती पण आता यांची हि प्रतीक्षा संपली आहे.