Sunita Williams Dance Video | भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्सन यांनी तिसऱ्यांदा अंतराळात झेप घेतलेली आहे. अंतराळात नीट कोणी उभे देखील राहू शकत नाही. अशातच सुनीता विल्यम्सचा अंतराळातून डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाचे प्रमुख आकर्षण बनत आहे. अनेकजण या विषयावर त्यांच्या कमेंट करत आहेत. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करत आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी गुरुवारी म्हणजे 6 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. त्यांनी अंतराळात झेप घेतलेली आहे. सुनिता विल्यम्स यांनी 2007 आणि 2012 मध्ये अंतराळ प्रवास केला आहे. अंतराळ्यात जाण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित केल्यानंतर 26 तासांनी बोईंग अंतराळयानाद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेण्यात आले.
सुनीता विल्यम्सने स्पेस स्टेशनवर पोहोचताच डान्स करून हा आनंद साजरा केला. डान्स केल्यानंतर त्यांनी अंतराळात उपस्थित असलेल्या इतर अंतराळवीरांनाही मिठी मारली. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहप्रवासी बुच विल्मोर यांचे स्टेशनवर बेल वाजवून स्वागत करण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.