हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 5 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले आहेत. अगदी एका आठवड्यासाठी गेलेले हे दोघे आता 8 महिने झाले तरी अंतराळातच आहे. दोघांनाही त्यांच्या आरोग्य संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. त्या दोघांना या संकटातून वाचवण्यासाठी आणि त्यांना पृथ्वीवर पुन्हा परत आणण्यासाठी नासा देखील विविध मोहीम राबवत आहेत. अशातच आता गुरुवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता मधील कझाकस्तामधील लॉन्च पॅड वरून नासाने एक अनक्रुड म्हणजे कोणताही सदस्य नसलेले विमान सोडण्यात आलेले आहे. जर शनिवारी रात्री 8 वाजता अंतरावर स्थानकावर पोहोचणार आहे.
अंतराळ सानिकावर अडकलेल्या क्रूडसाठी तीन टन अन्न इंधन आणि आवश्यक अशा वस्तू पाठवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतराळवीरांचे अन्न देखील संपत आल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता तात्काळ तीन टन अन्न अंतराळात पाठवलेले आहे. या आधी 8 नोव्हेंबर रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये त्या दोघांचेजी वजन खूप कमी झाल्याचे दिसत आहे. आणि त्यांच्या प्रकृतीबद्दलही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावेळी नासाच्या स्पेस ऑपरेशन मिशन डायरेक्टरचे प्रवक्ते जीमी रसेल यांनी सांगितले की, “स्पेस स्टेशनवरील सर्व नासा अंतराळवीरांचे नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. समर्पित फ्लाईटच्या सर्जन त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवत आहेत आणि सध्या सर्वजण चांगल्या स्थितीमध्ये आहेत.”
हाती आलेल्या माहितीनुसार माणूस जर जास्त काळ अंतराळात राहिला, तर तुमच्या शरीरासाठी ते चांगले नसते. यामुळे तुमची हाडे कमकुवत होतात. आणि वजन देखील अत्यंत कमी होते. तसेच अंतराळात जास्त काळ राहिल्याने लाल रक्त पेशी कमी होऊ लागतात. आणि याचा धोका मानवाच्या शरीराला होऊ शकतो. तसेच डोळ्यांच्या नसांवर देखील दाब पडल्याने दृष्टी देखील खराब होते. यावेळी अंतराळवीरांना दररोज व्यायाम करणे गरजेचे असते. जेणेकरून त्यांच्या हाडांवर कोणताही परिणाम होणार नाही.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पुन्हा एकदा कधी पृथ्वीवर येणार याची सगळेजण वाट पाहत आहेत. त्यांच्या विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांची ही मोहीम 8 महिन्यांपर्यंत लांबली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2025 मध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर येणार आहे.