हायकोर्टान शिंदे सरकारला घेरल!! सरकारी रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी उद्या होणार तातडीनं सुनावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन दिवसात राज्यातील सरकारी रुग्णालयात घडलेल्या मृत्यूप्रकरणी बॉम्बे हायकोर्टात सुओ मोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या तातडीने सुनावणी होणार आहे. या सर्व प्रकरणाची हायकोर्टाने स्वतःहून दखल घेतली आहे. त्यामुळे उद्या तातडीने मृत्यूप्रकरणी केली जाणार आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील सरकारी रुग्णालयात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे लक्ष देत उद्या हायकोर्टात तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे. उद्या राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करा असे आदेश महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांना देण्यात आले आहेत.

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत झालेल्या रुग्णांमध्ये काही नवजात बालकांचा देखील समावेश आहे. मंगळवारी याच रुग्णालयात आणखीन 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात 24 तासात दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतकेच नव्हे तर नागपूरमधील शासकीय रुग्णालयात देखील तब्बल 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती या सर्व घटनेचा तपास करून त्याचा अहवाल सरकार पुढे मांडणार आहे. या चौकशी दरम्यान मृत्यू प्रकरणात जे लोक दोषी आढळतील त्यांच्यावर सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.