हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णयावर लवकर सुनावणी व्हावी, यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना, आता याप्रकरणाची मोठी बातमी बाहेर येत आहे. या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावली असून, दोन आठवड्यात उत्तर मागितले आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक निर्णय होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष निष्क्रियता आणि पक्षपातीपणा दाखवत असल्याचा ठाकरे गटाचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. या याचिकामध्ये ठाकरे गटाने म्हंटले होते कि विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही तीन वेळा गेलो आणि त्यांना तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली. पण त्यांनी काहीच हालचाल केली गेली नाही.
यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी 2 आठवड्यात लेखी उत्तर द्यावं अशी नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांना बजावण्यात आलेल्या या नोटिसमध्ये अध्यक्षांना फक्त त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर आता यावर काय उत्तर देता आणि सर्वोच्च न्यायालय त्यांना कोणते निर्देश देणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे.