सर्वात मोठी बातमी! पुणे लोकसभा पोटनिवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाची स्थगिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने पुणे लोकसभा पोटनिवडणुका घेण्यास स्थगिती आणली आहे. “सार्वत्रिक निवडणुकीला आता थोडाच वेळ बाकी आहे, त्यामुळं पोटनिवडणूक नको” असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या एका निकालामुळे आता पुणे निवडणुकांची पुढील सूत्रे हालणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना चार आठवड्यांची मुदत दिली आहे. तसेच पुढील सुनावणी सात आठवण्यात येणार असल्याचे देखील सांगितले आहे. मुख्य म्हणजे, या सुनावणीवेळीच पोटनिवडणुकीसंदर्भात कायद्याची स्पष्ट करू, असे देखील सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. परंतु आता सात आठवड्यांनी सुनावणी होईपर्यंत या काळात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान 29 मार्च रोजी पुण्याचे खासदार गिरीश बापट रोजी निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीचा मुद्दा उपस्थित झाला होता. रिक्त झालेल्या जागेसाठी 6 महिन्यांत पोटनिवडणूक घेणे गरजेचे असताना देखील आयोगाने निवडणूक न घेतल्यामुळे याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना, “लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक तत्काळ घ्या” असे आदेश आयोगाला न्यायालयाने दिले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा आदेश मोडत लोकसभा पोटनिवडणुका घेण्यास स्थगिती दिली आहे.