सुप्रीम कोर्टाचा ठाकरेंना धक्का, शिंदेंना दिलासा : आता लक्ष निवडणूक आयोगाकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वादात शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे खरी शिवसेना कुणाची हे आता निवडणूक आयोग ठरविणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या आयोगाच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष लागून राहणार आहे.

निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थिगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या  कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. खरी शिवसेना कुणाची. शिवसेनेच चिन्ह धनुष्यबाण कुणाला द्यायचं हे आता निवडणूक आयोग ठरवणार आहे.

निवडणूक आयोगाला निर्णय घेऊ द्या, असे निवडणूक आयोगाच्या वकीलाचे म्हणणे होते.  सुप्रीम कोर्टाने मोठा शिंदे गटाला सुप्रीम दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी जे काही पुरावे दिलेत. त्यावरून निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. या निर्णयामुळे शिंदे गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी हा अंतिम निर्णय नसल्याचे म्हटले आहे.