सुरुवातीच्या कलात सुप्रियाताई, कोल्हे, शाहू महाराज, विशाल पाटील आघाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. देशात एकीकडे भाजपप्रणीत NDA ला मोठं यश मिळत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती २१ जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी २६ जागांवर आघडीवर दिसत आहे. सुरुवातीच्या कलात सुप्रियाताई, कोल्हे, शाहू महाराज आणि सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आघाडीवर आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार या नणंद भावजय या लढाईत सुप्रियाताई आघाडीवर दिसत आहेत, तर शिरूर मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे, याठिकाणी आढळराव पाटील हे पिछाडीवर दिसत आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक महत्वाचा मतदारसंघ असलेल्या कोल्हापुरात शाहू महाराज यांनी संजय मंडलिक यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. महत्वाची बाब म्हणजे सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे पुढे दिसत आहेत.

पहा कोण कोण आघाडीवर ? Lok Sabha 2024 Result

बारामती – सुप्रिया सुळे
माढा – धैर्यशील मोहिते पाटील
सातारा – उदयनराजे भोसले
कोल्हापूर – शाहू महाराज
सोलापूर – प्रणिती शिंदे
नागपूर- नितीन गडकरी
ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
पालघर – भरती कामडी
ठाणे- राजन विचारे
लातूर शिवाजी कालगे
गडचिरोली- नामदेव किरसाण
नाशिक – राजाभाऊ वाझे
शिरूर- अमोल कोल्हे
बुलढाणा- प्रतापराव जाधव
ईशान्य मुंबई – मिहीर कोठे

रामटेक – राजू पारवे
सिंधुदुर्ग – नारायण राणे
यवतमाळ – संजय देशमुख
नांदुरबार- हिना गावित
दिंडोरी – भास्कर भगरे
रायगड – अनंत गीते
धुळे – सुभाष भामरे