उर्फी जावेदच्या कपड्यांतील वादावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या विचित्र फॅशनमुळे वारंवार चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या कपड्यावरून उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु आहे. यावरून राजकारण तापले असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी निशाणा साधला आहे. या प्रकरणावर आता वर राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उर्फी जावेदपेक्षा आज देशासमोर याच्या पेक्षाही मोठे प्रश्न आहेत. त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत,” असे सुळे यांनी म्हंटल आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात सिंहगडावर उपस्थिती लावत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मी अनेकवेळा प्रतिक्रया देत असते. महाराष्ट्रात नक्की चाललंय काय? महाराष्ट्रात देशात उर्फी जावेदवरुन जे काही प्रकरण चालले आहे. त्याबद्दल मी नक्की माहिती घेईन आणि त्यावर सविस्तर बोललें मात्र, सध्या यापेक्षाही अनेक मोठे प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

मी नेहमी एक शिवप्रेमी आणि इतिहास प्रेमी म्हणून सिंहगडावर येत असते. आज या ठिकाणी आल्यावर येथे कचरा पाहून वाईट वाटले. गड किल्ले म्हणजे आपली पवित्र वास्तू आणि त्यावरती कचरा होणं दुर्दैवी आहे. ऐतिहासिक ठिकाणी स्वच्छ राहावी हाच माझा प्रयत्न आहे. अजितदादा पुण्याचे पालकमंत्री असताना सिंहगडासाठी जो काही निधी त्यांनी दिला तेवढा निधी फक्त सिंहगडाला द्या, एवढीच मागणी ED सरकारकडे करत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले.