सुप्रिया सुळे यांचे ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन

0
37
supriya sule
supriya sule
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | सुरज शेंडगे

सुप्रिया सुळेंनी रस्त्यावरील खड्डयांच्या समस्येवर अनोखा पवित्रा घेतला असून त्यांनी ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन सुरू केले आहे.रस्त्यावरील खड्डे हा अत्यंत गंभीर प्रश्न बनला असून त्यावर सरकार उदासीन आहे. राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांनी अनेक बळी घेतले आहेत.अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
रस्त्यावर वाढत असलेल्या खड्ड्यावर उपाय म्हणून राज्यसरकारने नवीन मुदत दिली असून डिसेंबर २०१८अखेर राज्यातील रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवले जातील असे राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षीही खड्ड्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे अशाच आक्रमक झाल्या होत्या तेव्हा ही त्यांनी सेल्फी विथ खड्डा आंदोलन सुरू केले होते. त्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि अनेकांनी आपल्या परिसरातील रस्त्यावरील खड्डयांसोबत सेल्फी काढून ‘सेल्फी विथ खड्डा’ या हॅशटॅग खाली सोशल मीडियावर प्रदर्शित केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here