भाजपच्या मिशन बारामतीवरून सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया; म्हणाल्या की त्यांना..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
आगामी बारामती लोकसभेसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांकडून पवारांचा बाल्लेकिला आम्हीच जिंकणार अशा वलग्नाही केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता अतिथी देवो भव .. या देशात १०० बारामती व्हायला पाहिजेत असं भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनीच म्हंटल होत. कदाचित तेच बघायला भाजपची लोक बारामतीला येत असतील अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. कराड येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामतीला जेवढी जास्त लोक बारामतीला येतील तेवढा मला आनंद आहे. या देशात १०० बारामती व्हायला पाहिजेत असं भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनीच म्हंटल होत. कदाचित तेच बघायला भाजपची लोक बारामतीला येत असतील आणि सगळ्यात चांगली गोष्टच सर्वाना हवीहवीशी असते त्यामुळे त्यांना येउद्या असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल.

देशात राजकीय नेत्यावर सुरु असलेल्या ईडी कारवाई वरूनही त्यांनी निशाणा साधला. देशातील ९५ टक्के ईडी कारवाया या विरोधानकांवर झाल्यात. ईडी का काही आता नवीन विषय नाही राहिला. लहान मुलेही एकमेकांशी भांडताना म्हणतात जास्त बोलू नको नाहीतर तुझ्यामागे ईडी लावीन. खार तर हे दुर्दैवी आहे. हे राजकारण नाही, महाराष्ट्राची संस्कृती नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल.

सत्ता येते आणि जाते पण ज्यापद्धतीने महाराष्ट्राचे राजकारण चाललं आहे हे काही बरोबर नाही. कोणी बंदूक काढत, कोणी म्हणतो एक थप्पड मारली कि तुम्ही चार मारा , कोणी ५० खोक्यांवरून आंदोलन केलं तर समोरचा म्हणतो तुम्हाला पण पाहिजे का ? हे सगळं दुर्दैवी आहे. यामुळे महाराष्ट्राचे नाव खराब होत. यापूर्वी महाराष्ट्राची एवढी चेष्टा झाली नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.