सुरेश धस यांची नार्को चाचणी करण्यात यावी; बड्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Suresh Dhas
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करणाऱ्या सुरेश धस यांच्यावरच संशयाचे सावट उभे राहिले आहे. कारण
सुरेश धस यांची नार्को चाचणी (Narco Test) करण्याची मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी केली आहे. यावेळी, धस यांचे सतीश भोसलेसोबत संबंध असल्याचा आरोप देखील वाघमारे यांनी लावला आहे.

नवनाथ वाघमारे यांच्याकडून धस यांची नार्को चाचणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात ठरली आहे. तसेच, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी सतीश भोसले हा सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. त्यांच्यानुसार, धस यांच्या आशिर्वादानेच खोक्या बेकायदेशीर धंदे करत होता. विशेष म्हणजे, हरण, काळवीट आणि मोराची तस्करी यामध्ये खोक्याचा मोठा सहभाग असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.

एसआयटी चौकशी आणि राजीनाम्याची मागणी

नवनाथ वाघमारे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सुरेश धस यांचा तातडीने राजीनामा घ्यावा,” असेही त्यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, धस आणि खोक्याच्या नातेसंबंधांमुळेच हा गुन्हेगारी रॅकेट इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यरत राहिले, असा आरोप त्यांनी केला आहे.

महत्वाचे म्हणजे, सतीश भोसलेला अटक झाल्यानंतर काही दिवसांतच आमदार सुरेश धस यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. वाघमारे यांच्या मते, खोक्याने आपले रहस्य उघड करू नये म्हणून धस यांनी ही भेट घेतली. त्यामुळे, “धस यांच्या भूमिकेचा खुलासा होण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे,” असेही वाघमारे यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, वन विभागाने खोक्या भोसलेच्या अतिक्रमित घरावर कारवाई करत ग्लास हाऊस हटवले. मात्र, त्यानंतर काही अज्ञात लोकांनी त्या परिसराला आग लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर सुरेश धस यांनी भोसले कुटुंबाला भेट देत वन विभागाच्या कारवाईवर आक्षेप घेतला. धस यांचा या सर्व कृतीमुळे त्यांचे वागणे संशयास्पद असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणते नवे वळण लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.