सूर्यकुमार यादव ‘या’ आजाराने ग्रस्त; भारतीय संघाला मोठा धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सध्या एका आजाराने ग्रस्त आहे. सूर्यकुमारच्या पायाला दुखापत झाली होती. साऊथ आफ्रिकेच्या मॅच दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे यादव हा आगामी अफगाणिस्तानसोबतचा T-20 मॅच खेळू शकणार नाही. असे असतानाच आता सूर्यकुमार यादव दुसऱ्याच कोणत्या एका आजाराने ग्रस्त आहे. या आजाराचे नाव हर्निया असून यावरील शस्त्रक्रियेसाठी सूर्यकुमार जर्मनीला जाणार आहे.

सूर्यकुमार आता बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. परंतु तो येत्या दोन – तीन दिवसात जर्मनी मधील म्युनिक येथे जावून शास्त्रक्रिया करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या शास्त्रक्रियेनंतर रिकव्हर होण्यासाठी सूर्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे सूर्या आयपीएलमध्येही दिसण्याची शक्यता कमी आहे. ऐन T-20 वर्ल्डकप आणि आयपीएल तोंडावर असतानाच ही परिस्थिती ओढवल्यामुळे मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पांड्यालाही मागील महिन्यात पार पडलेल्या वर्ल्डकप मध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे तो सुद्धा अजून तंदुरुस्त झाला असून आगामी अफगाणिस्तान विरुद्धच्या सिरीज मध्येही त्यालाही मुकावे लागणार आहे. भारतीय संघासाठी हा आणखी एक धक्का आहे.

हार्निया म्हणजे काय?

हार्निया म्हणजे ज्याला ऍथलेटिक पबल्जिया किंवा स्पोर्ट्समॅन्स हर्निया आणि गिलमोरच्या मांडीचा सांधा देखील म्हणतात.  यामध्ये स्नायूला दुखापत झाल्यामुळे तीव्र वेदना होतात.  स्पोर्ट्स हर्निया बहुतेकदा अशा लोकांमध्ये होतात जे खेळ खेळतात ज्यामध्ये अचानक दिशा बदलणे किंवा तीक्ष्ण वळणे समाविष्ट असतात. स्पोर्ट्स हर्निया होण्याची शक्यता बहुतेक फुटबॉल, कुस्ती आणि आइस हॉकी या खेळांमध्ये असते. त्यामुळे सूर्या या आजाराने ग्रस्त आहे. मात्र त्यावर्ती उपचार होऊ शकतात. आणि तो बराही होऊ शकतो. BCCI ने सांगितल्याप्रमाणे सूर्या या आजारावर मात करून लवकरच पुन्हा मैदानात दिसणार आहे.