शंभुराज देसाई लक्षात ठेवा इलाका तुम्हारा, लेकिन धमाका हमारा होगा ! ; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करत आहेत. येणाऱ्या काळातत्यांना गुलाल मिळू द्यायचा नाही. तुमच्या बालेकिल्ल्यात मी येऊन बोलत आहेत. तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता? तुमच्या आजोबाने स्वाभिमान अबाधित ठेवला. तुम्हाला आजोबांचे विचार समजले नाही, शंभूराजेंनी आतापर्यंत दारूबंदीचा निर्णय का घेतला नाही, असा सवाल करत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला.

ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी अंधारेंनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यावर निशाणा साधला. यावेळी अंधारे म्हणाल्या की, येणाऱ्या काळात कोणत्याही परिस्थितीत काहीही झाले तरी शंभुराज देसाई यांना गुलाल मिळू न देण्याचा कार्यर्त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पाटण मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत.

देसाईंनी नात्याला काळिमा फासण्याचे काम केले आहे. शंभुराज यांचे मला कौतुक आहे. इलाका तुम्हारा, धमाका हमारा तुमच्या बालेकिल्ल्यात मी येऊन बोलत आहेत. तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? तुम्ही आजोबांच्या नावाला काळीमा फासला. मी जे काही बोलत आहे, ते रेकॉर्ड करून खबऱ्यानी देसाई यांना पाठवावे. शंभुराज तुम्हाला निवडणुकीतील लीड किती आणि तुम्ही बोलताय किती? चाळीसजण रोज बडबडत आहेत. याचाच अर्थ महाप्रबोधन यात्रा यशस्वी झाली असल्याचे अंधारे यांनी म्हंटले.

मोदी-शाह यांनी मुंबईत 2 BHK फ्लॅट घ्यावा

यावेळी अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या दौऱ्यावरून त्याच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, मोदी आणि शहा यांचे मुंबई आणि पुण्यातील दौरे वाढले आहेत. या दोघांनी सतत मुंबईत येण्यापेक्षा मुंबईतच एखादा टू बीएचकेचा फ्लॅट घेऊन राहावे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

तानाजी सावंत आरशात बघून स्वतःशीच बोलत असतील : अंधारे

यावेळी अंधारे यांनी तानाजी सावंत यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, तानाजी सावंत हे आरशात बघून स्वतःशीच बोलत असतात. अशा आरशात बघून बोलणाऱ्या लोकांबद्दल काही बोलायचं नसतं. त्यांचं जेवढं डोकं आहे, तेवढं ते बोलले आहेत. आम्ही त्या स्तरावर उतरणार नाही, असेही अंधारे यांनी म्हंटले.

म्हणून दिला कोश्यारींनी पदाचा राजीनामा : अंधारेंनी सांगितलं नेमकं कारण

कोश्यारींनी महाराष्ट्राची जी अस्मिता व महापुरुषांचा अवमान करण्याची कृती केली. आता जी कृती आहे ती पक्षाला डॅमेज होत आहे तो भरून काढण्यासाठी कोश्यारींनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो मुंबई महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे. मात्र, त्यांनी लक्षात घ्यावे कि हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र महापुरुषांचा अवमान कधीही विसरणार नाही, असे अंधारे यांनी म्हंटले.