हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. महाड येथे हि दुर्घटना घडली असून तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे (Sushma Andhare Helicopter Crash) सांगण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. सुषमा अंधारे हेलिकॉप्टर बसण्यापूर्वीच ते क्रॅश झाल्याने मोठी दुर्घटना टळली असं म्हणावे लागेल.
नेमकं काय घडलं- Sushma Andhare Helicopter Crash
याबाबत अधिक माहिती अशी कि, आज सकाळी 9.30 वाजता सुषमा अंधारे बारामतीच्या दिशेने जाणार होत्या .बारामतीमधील महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाड येथून हेलिकॉप्टरने बारामतीला जाणार होत्या. त्यानुसार त्या हेलिपॅडवर पोचल्या सुद्धा, मात्र त्याच दरम्यान त्यांच्या समोरच हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं (Sushma Andhare Helicopter Crash) … अचानक घडलेल्या या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. मात्र सुदैवाने पायलट सुखरूप असून स्थानिक नागरिकांनी त्याला सुखरूप हेलिकॉप्टर मधून बाहेर काढलं
दरम्यान, या हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी आपण सुखरूप असल्याची माहिती दिली. मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत त्यामुळे कोणतीही चिंता नसावी, सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे आम्ही सर्व सुखरुप आहोत, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.