‘विधी लिखीत’ कायदे पुस्तिका प्रकाशित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली:- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते झाले. ‘एनआरआय विवाह आणि मानवी तस्करी – समस्या आणि उपाययोजना’ या विषयांवर दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे उपस्थित होते.

याप्रसंगी ‘विधि’-लिखित नावाची विविध कायद्यांची सर्वंकष माहिती देणारी पुस्तक मालिका केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते यावेळी नवी दिल्ली  महाराष्ट्र सदन येथे प्रकाशित करण्यात आली. यामुळे आता महिलांना कायद्याची भाषा व ज्ञान मराठी मधून उपलब्ध झाले आहे. यामध्ये एकूण नऊ प्रकारे कायदे हे शब्दबद्ध करुन त्यांची स्वतंत्र कायदे पुस्तिका आता राज्य महिला आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे.

Leave a Comment