मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट; 2 पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईजवळ पालघरच्या समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. धक्कादायक म्हणजे या बोटीत 2 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. आज शनिवारी सकाळच्या सुमारास पालघरपासून 44 नॉटिकल मैल अंतरावर ही बोट आढळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नौदल आणि तटरक्षक दलाकडून बोटीची तपासणी सुरू आहे.

मुंबईतील 26 -11 च्या हल्लानंतर समुद्रातील संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी एक जॉईंट ऑपरेशन सेंटर नावाची एक संस्था बनवण्यात आली होती. या संस्थेकडून पालघरच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसल्याची आणि त्यावर दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बोटीमध्ये 13 भारतीय आणि दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळताच संपूर्ण यंत्रणा सक्रिय झाली आहे.

या बोटीबाबत माहिती मिळताच सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. यानंतर या बोटीचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलिसांची सागरी पोलिस टीम या बोटीचा शोध घेत आहे. इंटेलिजेन्स ब्युरो आणि सीबीआयदेखील ही बोटीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

यापूर्वी, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सुद्धा अशाच प्रकारे एक संशयास्पद बोट उरण येथील करंजाजवळच्या समुद्रात सापडली होती. कोणताही नंबरप्लेट नसलेली बोट सापडल्याने बोट ताब्यात घेण्यात आली. मत्स्य विभाग गस्त घालत असताना ही बोट सापडली. डिझेल चोरीसाठी बोट वापरण्यात येत असल्याचा संशय त्यावेळी व्यक्त केला जात होता.