Suzuki Electric Scooter : Suzuki भारतात लाँच करणार पहिली Electric Scooter; काय फीचर्स मिळणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २ वर्षांपासून भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती पाहायला मिळत आहे. पेट्रोल डिझेलच्या खर्चापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. गर्भकांची वाढती मागणी बघता जवळपास सर्वच वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जगातील आघाडीची कंपनी Suzuki लवकरच आपली पहिली Electric Scooter भारतात लाँच (Suzuki Electric Scooter) करणार आहे. Suzuki कंपनीच्या गाड्या भारतीय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. त्यामुळेसुजूकीच्या इलेक्ट्रिक गाडीला सुद्धा ग्राहकांचा चांगला पाठिंबा मिळेल असं बोललं जातंय.

कधी लाँच होणार सुजूकीची इलेक्ट्रिक स्कुटर? Suzuki Electric Scooter

रिपोर्टनुसार, XF091 असं या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव असू शकते. कंपनी या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन सुरू करू शकते. त्यानंतर सुजूकीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर 2025 च्या पहिल्या तिमाहीत लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनी दरवर्षी या स्कूटरच्या 25 हजार युनिट्सचे उत्पादन करू शकते. खास बाब म्हणजे भारतीय बाजारपेठेतील इतर इलेक्ट्रिक स्कूटरप्रमाणे सुझुकीची ही इलेक्ट्रिक स्कूटर (Suzuki Electric Scooter) फिक्स बॅटरी पॅकसह लाँच होऊ शकते.

सुझुकीच्या या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये नेमकी किती पॉवरची बॅटरी असेल? एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ती किती किलोमीटर अंतर पार करेल आणि या स्कुटरचा लूक आणि डिझाईन कस असेल याबाबत कोणतेही डिटेल्स समोर आलेले नाहीत. सुझुकीने वर्षभरापूर्वी ई-बर्गमन स्कूटरची झलक दाखवली होती. ही स्कूटर स्वैपेबल बॅटरी पॅकसह आली होती मात्र भारतात लाँच होणारी स्कुटर मात्र त्यापेक्षा वेगळी असेल असं बोललं जातंय. सध्या भारतीय बाजारात ओला, अथर बजाज कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटर चांगल्याच फॉर्मात आहेत आणि त्यांची विक्रीही जोरदार होत आहे. आता सुजूकीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर भारतात लाँच केल्यानंतर या इतर कंपन्यांना फटका बसू शकतो.