Suzuki V-Strom 800DE : Suzuki ने लाँच केली नवी स्पोर्ट बाईक; लूक पाहूनच व्हाल फिदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात स्पोर्ट बाईक फॅड तरुणांमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. खास करून देशातील तरुण वर्गाला स्पोर्ट बाईकचे मोठं आकर्षण आहे. त्यामुळे अनेक कंपन्या नवनवीन स्पोर्ट बाईक मार्केट मध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्शवभूमीवर देशातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Suzuki ने भारतीय बाजारपेठेत V-Strom 800DE नावाची नवीन स्पोर्ट केली आहे. कंपनीने या गाडीची सुरुवातीची किंमत 10.30 लाख रुपये ठेवली आहे. आज आपण या बाईकचे खास फीचर्स आणि त्याच्या स्पेफिफिकेशनबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

Suzuki V-Strom 800DE मध्ये पाठीमागे आणि पुढील बाजूला शोवा सस्पेंशन देण्यात आले आहे. ज्याचा ग्राउंड क्लीयरन्स 220mm आहे. ब्रेकिंगसाठी, समोर आणि मागील डिस्क ब्रेक बसवण्यात आले आहेत. हि स्पोर्ट बाईक कोणत्याही रस्त्यावर अतिशय व्यवस्थित आणि आरामदायी पद्धतीने चालवता यावे यासाठी 21-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर स्पोक व्हील देण्यात आले आहेत.

इंजिन – Suzuki V-Strom 800DE

गाडीच्या इंजिन बाबत सांगायचं झाल्यास, Suzuki V-Strom 800DE मध्ये 776cc पॅरलल-ट्विन इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सला जोडण्यात आले असून 83bhp पॉवर आणि 78Nm पीक आउटपुट जनरेट करते. भारतीय बाजारात त्याची स्पर्धा BMW F850 GS आणि Triumph Tiger 900 शी आहे. भारतीय बाजारात हि बाईक BMW F850 GS आणि Triumph Tiger 900 या गाडयांना थेट टक्कर देईल.

अन्य फीचर्स –

गाडीच्या अन्य फिचरबाबत सांगायचं झाल्यास, V-Storm मध्ये 5-इंचाचा TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे आणि एक सर्वसमावेशक इलेक्ट्रॉनिक रायडर एड्स पॅकेज देखील मिळते, ज्यामध्ये राइड मोड, ट्रॅक्शन कंट्रोल, ॲडजस्टेबल विंडशील्ड, राइड-बाय-वायर यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे . सुझुकीची ही स्पोर्ट बाईक भारतीय बाजारपेठेत ट्रायंफ टायगर 900 आणि BMW 850 GS सारख्या गाडयांना थेट टक्कर देईल.