फलटण- सातारा रोडवर स्वाभिमानीचा चक्का जाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण प्रतिनिधी अनमोल जगताप
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाला फलटण शहरातही प्रतिसाद मिळाला. सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फलटण- सातारा रोडवर वाठार निंबाळकर, चिंचपाटी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आला.

कृषी पंपाची वीज तोडणी त्वरित थांबवावी, उसाला एकरकमी एफआरपी निकाली सदोष कृषी पंपाची वीज बील दुरूस्त करून मिळावे. वीज दर नियामक आयोगात सुचवलेली 37 टक्के दरवाढ रद्द करावी. शेतीला दिवसा 12 तास लाईट मिळावी, ऊस तोडणी साठी 5 ते 10 हजार मागणी करणा-या मुकादमावर खंडणीचे गुन्हे दाखल करावे. नियमीत कर्ज फेड करणा-या शेतक-यांना 50 हजार प्रोत्साहन पर अनुदान त्वरीत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावेत. या प्रमुख मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन फलटण तालुका वतीने करण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस डाॅ. रविंद्र घाडगे, तालुका अध्यक्ष नितीन यादव, युवा आघाडी राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, पक्ष तालुका अध्यक्ष दादा जाधव, फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर, पक्ष उपाध्यक्ष शकिल सिकंदर मणेर, बाळासाहेब शिपकुले, प्रल्हाद अहिवळे, निखिल नाळे, शशिकांत नाळे, किसन शिंदे, पिंटू भापकर, राहुल कदम उपस्थित होते.